शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

Anand Mahindra यांच्या स्कॉर्पिओला मिळालं नवं नाव; ट्वीट करत म्हणाले, “माझा…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 10:03 IST

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी स्वत:साठी एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे, जी शुक्रवारी त्यांना मिळाली. त्यांनी ट्विटरवर कारच्या चाव्या घेतानाचे छायाचित्र पोस्ट करून त्याच्या स्कॉर्पिओ-एनसाठी नाव विचारले होते.

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच आपल्यासाठी एक नवी कार खरेदी केली. यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटरवर नवीन कारची स्कॉर्पिओ एनची चावी घेताना एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी नेटकऱ्यांना, गाडीसाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहनही केले होती. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांनी आता आपल्या गाडीसाठी एक नाव मिळाल्याचे म्हटले आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या नवीन स्कॉर्पिओ-एनसाठी अंतिम नाव जाहीर केले. आपल्या कॉर्पिओसाठी नवीन नाव मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतीही स्पर्धा शिल्लक राहिली नव्हती. भीमच विजेता आहे, माझा लाल भीम, नावं सूचवल्याबद्दल धन्यवाद असे ट्वीट त्यांनी केले आहे.नावसुचवायलासांगितलेहोतेआनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये महिंद्रा लाल रंगाच्या स्कॉर्पिओ एन जवळ हातात पुष्पगुच्छ घेऊन दिसत आहेत. त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती गाडीची चावी घेऊन उभा आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन दिले की, 'माझ्यासाठी मोठा दिवस आहे. मला Scorpio-N मिळाली. गाडीसाठी चांगले नाव सूचवा.' विशेष म्हणजे, आनंद महिंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राची नवीन Scorpio-N एसयूव्ही लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत जाते. आनंद महिंद्रा यांनी या गाडीचे टॉप व्हेरिअँट खरेदी केले आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्रा