शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

गर्लफ्रेंड फसवत नाही ना? हे तपासण्यासाठी 'अशी' केली जाते लॉयॉलिटी टेस्ट, पाहुन व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 15:27 IST

आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आपल्याशी कितपत एकनिष्ठ आहेत यावरुन मनात संशयकल्लोळ माजलेला असतो. त्यामुळे अनेकदा वादविवाद घडतात. या गोष्टींचा अडथळा येऊ नये म्हणून अमेरिकेतील तरुणांनी भलतीच शक्कल लढवली आहे.

मानवी संस्कृती आणि कलेचा प्रेम हा अविभाज्य घटक बनला आहे. प्रेम ही एक वेगळीच परिभाषा आहे. प्रेमात विश्वास ही गोष्ट महत्त्वाची भूमिका बजावत असते. जोडीदाराशी एकनिष्ठ असण हे खूप महत्त्वाचे ठरते. पण असे असले तरी काही ना काही संशयीत गोष्टी या घडत असतात. आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आपल्याशी कितपत एकनिष्ठ आहेत यावरुन मनात संशयकल्लोळ माजलेला असतो. त्यामुळे अनेकदा वादविवाद घडतात. या गोष्टींचा अडथळा येऊ नये म्हणून अमेरिकेतील तरुणांनी भलतीच शक्कल लढवली आहे.

अमेरिकामध्ये अलाबामा (Alabama, America) येथे राहणारा 20 वर्षीय तरुण अजब व्यवसाय करतो. तो दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंडसोबत फ्लर्ट करतो आणि पैसे मिळवतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हो. यामागचे कारणही तसेच आहे. जेवियर लॉन्ग (Xavier Long) असे या तरुणाचे नाव आहे.

जेवियर हा दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत फ्लर्टिंग करण्याचा व्यवसाय (American Man Flirts with unknown women) करतो. आता हे कसलं काम असे म्हणाल. जेवियर हा एक प्रकारचा व्यावसायिक गुप्तहेर आहे जो इतरांच्या गर्लफ्रेंडची प्रामाणिकता तपासण्यासाचे काम करतो. आणि आपल्या गर्लफ्रेंडची प्रामाणिकता (Man gets Paid to do loyalty test on girlfriends) त्यांचे बॉयफ्रेंड जेवियरला पैसे देतात. जेवियरने याबद्दल माहिती देताना म्हणाला, अनेक तरुण आहेत ज्यांना रिलेशनशिपमध्ये असुरक्षितता वाटते. त्यांना वाटते की आपली गर्लफ्रेंड आपल्याला धोका देईल. त्यांची लॉयल्टी टेस्ट करण्यासाठी जेवियरला कामाला लावतात.

त्यानंतर जेवियर त्या तरुणींना सोशल मीडियावरुन मेसेज करतो आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. जर त्याला त्या तरुणी त्याच्याकडे आकर्षित होत आहेत किंवा त्यांचे दुसरीकडे असलेले नाते लपवण्याचा प्रयत्न केला याची जाणील झाली की त्याची माहिती जेवियर बॉयफ्रेंडला देतो.

विशेष गोष्ट म्हणजे या व्यवसायामध्ये जेवियर एका महिन्या एका लाखाची कमाई करतो. जेवियर म्हणाला, खुप कमी वेळेत माझ्या व्यवसायात यश मिळाले आहे. आता तो त्याच्या फीमधून एका आठवड्यात 1 लाख रुपयांहून अधिक कमावतो. जेवियरने सांगितले की तो खरी रक्कम सांगू शकत नाही, परंतु त्याने या व्यवसायातून खूप कमावले आहे

जेवियरने हे काम पहिल्यांदा मोफत सुरू केले होते त्याच्या एका टिकटॉक फॉलोअरच्या विनंतीवरून ज्याने त्याला मेसेज करून गर्लफ्रेंडची एकनिष्ठा तपसण्यासाठी सांगितले. जेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्याने ठरवले की आपण हाच व्यवसाय करायचा. यानंतर त्याचा डीएम बॉयफ्रेंडच्या मेसेजने भरला होता.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके