Interesting Facts : रेल्वे स्टेशनची नावं साधारणपणे लहान आणि लक्षात राहणारी असतात. पण भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे ज्याचं नाव वाचाल तर बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. जर तिकीट काढायला गेला तर नाव सहजपणे घेताही येणार नाही असं आहे. आंध्र प्रदेशातील या स्टेशनचं नाव देशात सगळ्यात लांब मानलं जातं.
वेंकटनरसिम्हाराजूवरिपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) असं या स्टेशनचं नाव आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवरील हे एक छोटं रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन आपल्या सगळ्यात मोठ्या नावामुळे प्रसिद्ध आहे.
स्थानिक लोक या नावाचं छोटं रूप वापरतात. “वेंकटनरसीम्हा” हे छोट्या रूपातील नाव आहे. हे स्टेशन चित्तूर जिल्ह्याजवळ आहे आणि दक्षिण रेल्वे झोनमध्ये येतं. रेल्वे स्टेशन छोटं असल्यानं इथे फार रेल्वे थांबत नाहीत. पण आपल्या नावामुळे हे स्टेशन लोकांमध्ये फेमस आहे.
या नावाचं संबंध स्थानिक जमीनदार वेंकटनरसिम्हा राजू यांच्याशी आहे. त्यांचं आणि 'पेटा' (गाव) शब्द जोडून स्टेशनला देण्यात आलं आहे. जेव्हाही या स्टेशनच्या नावाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो, तेव्हा त्यावर अनेक मजेदार कमेंट्स येतात.
भारतात मोठं नाव असलेले अनेक रेल्वे स्टेशन आहेत. जसे की, चेन्नईमधील ‘पुरट्टाची थलपति विजय नगरम’ आणि उत्तर प्रदेशातील ‘पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन’. पण लांबीच्या बाबतीत वेंकटनरसिम्हाराजूवरिपेटा सोबत कुणीही स्पर्धा करू शकत नाही.