शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

३.७ कोटींचे घर केवळ २८० रुपयात ? फक्त ही एक 'अट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 11:52 IST

२८० रुपयांच्या लॉटरी तिकिटावर हे आलिशान घर मिळणार आहे. हे तीन मजली घर असून याची बाजारातील किंमत ३.७ कोटी रुपये आहे

सध्या लाख आणि कोटीमध्ये असलेल्या घरांच्या किंमती. घर घ्यायचं म्हणलं तर मोठी उडी मारण्यासारखेच आहे. अनेकांसाठी तर स्वत:चे घर घेणे म्हणजे स्वप्नच आहे. पण जर तुम्हाला फक्त २८० रुपयात घर मिळत असेल तर ? हे खरे आहे, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या तीन भावांनी ही खास ऑफर दिली आहे. ते त्यांच्या घराची डील केवळ २८० रुपयात करणार आहेत.

यामागे खरी गोष्ट ही की, २८० रुपयांच्या लॉटरी तिकिटावर हे आलिशान घर मिळणार आहे. हे तीन मजली घर असून याची बाजारातील किंमत ३.७ कोटी रुपये आहे. ४ बेडरुम, एक मोठे स्वयंपाकघर, डायनिंग एरिया, लिव्हिंग रुम आणि एक मेंटेनंस यार्ड अशी घराची रचना आहे. विशेष म्हणजे घरात अत्याधुनिक फर्निचर आहे आणि हिवाळ्यात खास शेकोटीची सुविधा आहे. या घरावर तीन भावांनी लॉटरी काढली आहे.डॅनियल, जेसन आणि विल ट्विनफोर अशी त्यांची नावे आहेत.

हे आलिशान घर जर भाड्याने दिले तर दरमहा तब्बल १ लाख ८८ हजार रुपये भाडं मिळू शकतं. आता हे घर फक्त २८० रुपयात खरेदी करण्यासाठी ट्विनफोर भावांना एका अटीची पुर्तता करावी लागणार आहे. स्टॅंप ड्युटी आणि लीगल फीस भरण्यासाठी जवळपास १ लाख ५५ हजार लॉटरी तिकिटे विकणे बंधनकारक आहे.  जर १ लाख ५५ हजार लॉटरी तिकिटे विकली गेली नाहीत तर जो विजेता असेल त्याला तिकिटाच्या एकूण रकमेची ७० टक्के फीस भरावी लागेल. 

४ बेडरुमच्या या आलिशान घराची खासियत म्हणजे याचे लोकेशन. लंडनच्या चैथम ट्रेन स्टेशनपासून हे अगदी जवळ आहे. तर व्हिक्टोरिया आणि लंडन सेंट पैनक्रास येथून एक तासाच्या अंतरावर आहे. ट्वेनफोर भावांनी याआधी त्यांच्या इतर संपत्ती असाच प्रकारे लॉटरी काढून विकल्या आहेत.