शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

सुंदर, तरुण दिसण्याचा हेवा वाटावा असा वारसा

By admin | Updated: July 6, 2017 02:08 IST

या छायाचित्रातील मुली या २० वर्षे वयाच्या मैत्रिणीच असल्याचे दिसते, परंतु तसे नाही तर या तिघीही सख्ख्या बहिणी असून यातील काही या

या छायाचित्रातील मुली या २० वर्षे वयाच्या मैत्रिणीच असल्याचे दिसते, परंतु तसे नाही तर या तिघीही सख्ख्या बहिणी असून यातील काही या दिसतात त्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या आहेत. या तिघी तैवानच्या सू कुटुंबातील आहेत. त्यांचे दिसणेच एवढे तरुण आहे की, त्याबद्दल त्यांचे इंटरनेटवर जोरदार कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, त्यांचे वय वाढत आहे किंवा त्यांचे तरुण दिसणे थांबत आहे, याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. या बहिणींची आई ६३ वर्षांची असली, तरी तीदेखील अशीच तरुण दिसते. ल्युरे सू ४१ वर्षांची असून, ती इंटिरियर डिझायनर आहे. दोन वर्षांपूर्वी ती तैवानमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी झाली आणि ती एकदम चर्चेत आली. कारण तिच्या वयावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. वय वाढले, तरी तरुण दिसण्याचा वारसा या कुटुंबात आहे. तिच्या बहिणीही अशाच त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा खूप कमी म्हणूनच तरुण व सुंदर दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसत नाही. फेफे सू हिने ४० वा वाढदिवस २६ जून रोजी साजरा केला. समाजमाध्यमांवर या बहिणी सध्या स्टार झाल्या असून, फेसबुकवर त्यांना ७० हजारांपेक्षा जास्त व इन्स्टाग्रामवर १२ हजारांपेक्षा जास्त चाहते मिळाले आहेत. फेफे फेसबुक व इन्स्टाग्रामव तिच्या छोट्या मुलीची छायाचित्रे नेहमी शेअर करते. तुमची कातडी निरोगी ठेवायची असल्यास सूर्यप्रकाश खूपच महत्त्वाचा आहे. अर्थात, उन्हाळ््यात खूप ऊन अंगावर घेणेही योग्य नाही, असे फेफे हिने सुचविले. ती म्हणाली की, कमी मांस खा आणि जास्त तंतुमय आहार घ्या. खूप व्यायाम करा आणि उच्च प्रोटीनचा आहार घ्या.