शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीमध्ये का जोडण्यात आला एक अतिरिक्त दिवस? का भासली गरज, कुठून झाली सुरुवात, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:01 IST

Leap Year: फेब्रुवारी महिन्यात दर चार वर्षांनी एकदा एक अतिरिक्त दिवस का जोडला जातो. त्यामागे नेमकं काय गणित आहे, त्याची गरज का भासली, हे तुम्हाला माहिती आहे का? या मागचं कारण आज आपण जाणून घेऊयात.

आज २९ फेब्रुवारी आहे, ही तारीख आता ४ वर्षांनंतर पुन्हा कॅलेंडरमध्ये दिसणार आहे. सध्या प्रचलित असलेल्या पंचागामध्ये महिन्याचे ३० किंवा ३१ दिवस असतात. तर फेब्रुवारी महिन्याचे २८ दिवस असतात. पण ४ वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये २९ तारीखही असते. या दिवसाला लोक आगळावेगळा दिवस मानतात. तसेच त्या दिवशी काही ना काही विशेष करतात. मात्र फेब्रुवारी महिन्यात दर चार वर्षांनी एकदा एक अतिरिक्त दिवस का जोडला जातो. त्यामागे नेमकं काय गणित आहे, त्याची गरज का भासली, हे तुम्हाला माहिती आहे का? या मागचं कारण आज आपण जाणून घेऊयात.

आपली पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घातले. त्यासाठी ३६५ दिवस ५ तास, ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद एवढा वेळ लागतो. मात्र ग्रेगरियन कॅलेंडरच्या हिशोबाने वर्षाचे ३६५ दिवसच निश्चित करायचे होते. त्यामुळे दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जातो. सौर वर्ष आणि कॅलेंडर वर्ष यामधील दिवसांचं अंतर कमी करण्यासाठी ४ वर्षांपर्यंत दरवर्षी ६ तास जोडले जातात. त्यामुळे चार वर्षांमध्ये एकदाच लीप वर्ष येतं. त्यात एक दिवस जोडल्याने वर्षाचे दिवस ३६६ एवढे होतात. यालाच लीप वर्ष असं म्हटलं जातं. 

कॅलेंडर वर्षानुसार एक वर्ष हे ३६५ दिवसांमध्ये पूर्ण होते. तर सौर वर्ष हे  ३६५ दिवस आणि सुमारे सहा तासांमध्ये पूर्ण होते. नासाच्या मते एका वर्षामध्ये सहा तास हे काही फार महत्त्वाचे नसतात. मात्र दीर्घकालीन हिशेबामध्ये ते खूप महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.  

ग्रेगरियन कॅलेंडरची सुरुवात सन १५८२ मध्ये झाली होती. त्यापूर्वी रशियातील ज्युलियन कॅलेंडर प्रचलित होते. त्या कॅलेंडरमध्ये वर्षाचे १० महिने होते. तसेच नाताळाचा एक दिवस निश्चित नव्हता. नाताळाच्या सणाचा एक दिवस निश्चित करण्यासाठी अमेरिकेतील एलॉयसीस लिलिअस याने ग्रेगरियन कॅलेंडरची सुरुवात केली होती. या कॅलेंडरनुसार जानेवारी वर्षाचा पहिला महिना तर डिसेंबर हा शेवटचा महिना म्हणून निश्चित करण्यात आले. तसेच या कॅलेंडरमध्ये २५ डिसेंबर ही तारीख नाताळासाठी निश्चित करण्यात आली. मात्र जेव्हा हे खूप संशोधन करून निष्कर्ष काढण्यात आला,  तेव्हा प्रत्येक ४ वर्षांनंतर वर्षामध्ये १ अतिरिक्त दिवस जोडला तर ५ तास ४८ मिनिटे आणि ४९ सेकंदांचा वेळ भरून निघेल असा तोडगा समोर आला. त्यानुसार ४ वर्षांनंतर एका वर्षाचे ३६६ दिवस असतील तर इतर वर्ष ही ३६५ दिवसांची असतील, असे निश्चित करण्यात आले.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय