शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आठ किलोमीटर खोल समुद्रात अडकलेली म्हैस, मच्छीमारांनी केले तब्बल ७ तास प्रयत्न पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:50 IST

किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर आत काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर ही एक म्हैस असल्याचं त्यांना समजलं. यानंतर मच्छिमारांनी माणुसकी दाखवत या म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

केरळच्या कोझीकोडमधील कोठी येथे समुद्रात उतरलेल्या ३ मच्छिमारांना गुरुवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास खोल समुद्रात काहीतरी वेगळंच दृश्य दिसलं. किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर आत काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर ही एक म्हैस असल्याचं त्यांना समजलं. यानंतर मच्छिमारांनी माणुसकी दाखवत या म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले (Fishermen Rescue Buffalo).

दोन तासाच्या प्रयत्नानंतर या प्राण्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात मच्छिमारांना यश आलं. यानंतर मच्छिमारांनी म्हशीला तिच्या मालकाच्या हवाली केलं. या घटनेबाबत माहिती देताना मच्छिमार ए टी फिरोज यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळी आम्हाला समुद्रातून अजब आवाज येत होते. यानंतर आम्ही बॅटरीच्या मदतीने प्रकाश करत आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर आम्हाला एक म्हैस पाण्यावर तरंगताना दिसली. म्हैस अतिशय थकली होती. फिरोज यांनी सांगितलं, की 'पाण्यात म्हशीला पाहून आम्ही आमचं हातातील काम सोडलं आणि म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. फिरोज यांच्यासोबत यावेळी ए टी झाकीर आणि टी पी पुवाद हेदेखील होते. तिघांनी मिळून अथक प्रयत्नांनंतर म्हशीचा जीव वाचवला'.

पुढे बोलताना फिरोज यांनी म्हटलं की 'ही म्हैस समुद्रात इतक्या खोलवर कशी गेली, याची काहीही कल्पना नाही. कामादरम्यान अशा प्राण्याला समुद्रात पाहाणं, हा आमच्यासाठीही पहिलाच अनुभव होता. या म्हशीला खेचून आमच्या बोटीपर्यंत आणणंदेखील खूप कठीण होतं. त्यामुळे आम्ही आणखी एक बोट तिथे आणली. यानंतर म्हशीला दोन प्लॅस्टिक कॅन बांधले, जेणेकरून ती वाहून जाऊ नये आणि सकाळी आठ वाजेपर्यंत तिला किनाऱ्यावर आणलं.'

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKeralaकेरळ