शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मधल्या तुम्हाला भरपूर हसवणाऱ्या वायरल पोस्ट एकदा नक्की बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 14:46 IST

२०१९ मध्ये  सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी घडल्या.

२०१९ मध्ये  सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी घडल्या. ज्यांनी तुम्हाला खळखळून हसवलं तसंच असे काही लोकं  टिकटॉक आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल झाले.  ज्यांची विनोदी शैली आणि खासियत  तुम्हाला  नक्की लक्षात  राहील.  चला तर मग जाणून घेऊया २०१९  या वर्षात सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या व्यक्ती आणि त्यांच्या  सोशल मीडिया पोस्ट बद्दल. 

हार्मोनियम चाचा 

एका पाकिस्तानी कॉमेडी शो मधील हा फोटो आहे. या फोटोवर  खूप मिम्स तयार करण्यात आले होते. हा मुलाखतीदरम्यानचा फोटो  मोठ्या प्रमाणावर व्हायरल  झाला होता.  या चाचांना हार्मोनियम वाजवता येत नाही  तरी ते धून वाजवत होते. 

रातोरात प्रसिद्ध झालेली रानू मंडल 

आपल्या अनोख्या आवाजमुळे सोशल मीडिया वर  रातोरात प्रसिध्द झालेली  रानू मंडल हिने कमी वेळात आपला भरपूर चाहतावर्ग मिळवला. तसंच रानूमंडलची सुरूवातीला खूप स्तुती केली गेली. त्यानंतर  अनेक वाद निर्माण झाले. मग रानूवर आधारीत बरेच मिम्स तयार  करण्यात आले होते. इतकेच  नाही तर रानूशी निगडीत असणारी प्रत्येक  गोष्ट तिचे कपडे, तसंच तिचा मेकओवर यांवर आधारीत मीम्सनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता.

हिंदूस्थानी भाऊ

विकास जयराम पाठक यांलाच हिंदूस्थानी भाऊ म्हटलं जातं. या भाऊच्या व्हिडीओला  इन्स्टाग्रावर खूप प्रसिध्दी मिळाली. तसंच आक्रमक असलेला भाऊ बीगबॉस १३ मध्ये सुध्दा प्रेक्षकांना पहायला मिळाला.

पाकिस्तानी फॅन

 हा सगळ्यात जास्त हसायला लावणारा आणि खूपच फनी असलेल्या २०१९ च्या पात्रांपैकी एक होता. २०१९ चा भारत विरुध्द पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर  एका पाकिस्तानी फॅनची आलेली ही  रिअ‍ॅक्शन खूपच व्हायरल झाली होती.

लँण्ड कराके दे भाई

या वायरल झालेल्या फोटोमध्ये  एक विपिन साहू नावाचा माणूस पॅराग्लाईडींग करत आहे. हा व्हिडीओ आपण सगळयांनी पाहिलाच असेल.  हा माणूस जमिनीपासून खूप उंचावर आला आहे. तसंच तो  घाबरल्यामुळे आपल्या इन्स्ट्रक्टरला ५०० रुपये आणखी घेऊन खाली उतरवण्यातची विनंती करत होता. 

भावांमधल प्रेम

२०१९ मध्ये एक व्हिडीयो व्हायरल झाला होता. त्यात  मोठ भाऊ आपल्या लहान भावासाठी फ्राईड राईस तयार करत होता. हा व्हिडीओ खूपच  भावनीक असून सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. यातून  एक मोठा भाऊ आपल्या लहान भावाची कशाप्रकारे काळजी घेत आहे. ते दिसून आलं.

पीछे तो देखो

अहमद शहा नावाचा एक पाकिस्तानी मुलगा भन्नाट व्हायरल झाला होता. पठाणाचा मुलगा असल्याचं या व्हिडीयोतून दिसून येते. पीछे तो  देखो असं तो म्हणत  होता. हा मुलगा त्याच्या क्यूटनेस आणि हावभावांमुळे सर्वाधिक व्हायरल झाला. 

अँग्री पाकिस्तानी मिम्स

क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान सरीम अख्खतर नावाच्या एका व्यक्तीने आपलं एक GIF सोशल मिडीय़ावर शेअर केलं होतं. त्यात पाकिस्तानी टिमच्या पराभवाद्दल त्यांच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव हे पाहण्यासारखे होते. या माणसाच्या रिअ‍ॅक्शनने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला .

RCB  गर्ल 

दिपीका गोशाल हीला RCB  गर्ल असं म्हटलं जातं. आइपीएलच्या  मॅचेस चालू असताना काही वेळासाठी मोठ्या पडद्यावर दिसलेली ही लाल टॉपमधली मुलगी खूप चर्चेत आली होती. तिचे इंस्टाग्रामवर ५००० फॉलोअर्स होते. त्यानंतर त्यांची संख्या २ लाख  ८० हजारांवर पोहोचली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके