महागडी दारू, सोन्याचा मुलामा असलेली सिगारेट; किम जोंग उनची हैराण करणारी लाइफस्टाईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:14 PM2023-08-22T12:14:42+5:302023-08-22T12:16:17+5:30

Kim Jong Un News: एका सुरक्षा एका अधिकाराऱ्याचा दावा आहे की, किमला ब्लॅक लेबल स्कॉच व्हिस्की आणि हेनेसी ब्रांडी पिणं फार आवडतं.

Kim Jong Un : Expensive liquor cigarettes wrapped in gold foil and royal train Kim Jong Un's expensive hobbies will surprise | महागडी दारू, सोन्याचा मुलामा असलेली सिगारेट; किम जोंग उनची हैराण करणारी लाइफस्टाईल...

महागडी दारू, सोन्याचा मुलामा असलेली सिगारेट; किम जोंग उनची हैराण करणारी लाइफस्टाईल...

googlenewsNext

North Korea News : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची नेहनीच वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चा होत असते. त्याची लक्झरी लाइफही नेहमीच चर्चेत असते. त्याचा एका दिवसाचा खर्चही हैराण करणारा आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या एका सुरक्षा एका अधिकाराऱ्याचा दावा आहे की, किमला ब्लॅक लेबल स्कॉच व्हिस्की आणि हेनेसी ब्रांडी पिणं फार आवडतं. ज्याच्या एका बॉटलची किंमत 7 हजार डॉलर इतकी असू शकते.

किम जोंग उन याला खाण्याचीही खूप आवड आहे. त्याला खाण्यात पर्मा हॅम जी इटलीच्या पर्मा भागातील एक डिश आहे आणि स्विस एममेंटलही त्याला आवडतं. त्याला जंक फूडही खूप आवडतं. असा दावा केला जातो की, 1997 मध्ये किम परिवारासाठी पिझ्झा बनवण्यासाठी इटलीतील एका शेफला कामावर ठेवलं होतं.

ब्राझीलमधील कॉफीचा शौकीन

इतकंच नाही तर किमला ब्राजीलमधील कॉफीही खूप आवडते आणि ही आवड पूर्ण करण्यासाठी तो दरवर्षी साधारण 9,67,051 डॉलर खर्च करतो. असंही म्हटलं जातं की, किम यवेस सेंट लॉरेंट ब्लॅक सिगारेट ओढतो जी सोन्याच्या मुलाम्यात लपेटून असते.

रेल्वेचा प्रवास आवडतो

किमला रेल्वेचा प्रवास जास्त आवडतो. सोव्हिएट लीडर जोसेफ स्टालिनने पन्नासच्या सुरूवातीच्या दशात किमच्या आजोबांना एक रेल्वे गिफ्टमध्ये दिली होती. जी नंतर किम परिवाराची शाही रेल्वे बनली. असं म्हटलं जातं की, 2011 मध्ये किम जोंग इल यांचा मृत्यू याच रेल्वेमध्ये काम करताना झाला होता.

ही एक फार खास रेल्वे होती जी 250 मीटर लांब आणि आधुनिक सोयी-सुविधा असलेली होती. यात 22 बोग्या होत्या. प्रत्येक बोगीमध्ये विशाल बाथरूम आणि डायनिंगची व्यवस्था होती.

या रेल्वेच्या सुरेक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. याचा स्पीड फार जास्त नव्हता. ही रेल्वे बुलेटप्रूफ आहे आणि याचं वजनही जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार, ही रेल्वे 60 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावते. यासाठी खास स्टेशन तयार करण्यात आलं आहे.

Web Title: Kim Jong Un : Expensive liquor cigarettes wrapped in gold foil and royal train Kim Jong Un's expensive hobbies will surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.