लोकांच्या हातात मोबाईल आल्यामुळे एखादी गोष्ट घडली की ती लगेच व्हायरल होते. सध्या इंटरनेटवर असाच एक ट्रेन्ड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये लोकं आपल्या चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. म्हणजे ती व्यक्ति डान्स करत करत गाडीसोबतच पुढे जात आहे. 'किकी चॅलेंज' (Kiki Challenge)या नावाने हा ट्रेंन्ड व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी हे चॅलेंज एक्सेप्ट करत आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पण पहायला गेलं तर असं करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे दुबई पोलिसांनी किकी चॅलेंजला वॉर्निंग दिली आहे. हे डान्स चॅलेंज खास करून अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये व्हायरल होत आहे.
याची सुरुवात तेव्हा झाली ज्यावेळी रॅपर ड्रेक ने 'In My Feelings'नावाचं गाणं शेअर केलं होतं. या गाण्याची पहिली लाईन, किकि, तू माझ्यावर परेम करतेस का?, तू रस्त्यात आहेस का? अशी आहे. यानंतर जो व्हायरल ट्रेंन्ड सुरु झाला. त्यामुळे गाणं मागे पडलं असून लोकं किकी डान्सच करू लागले आहेत.
सर्वात आधी शिग्गी नावाच्या एका कॉमेडियनने आपल्या 16 लाख फॉलोअर्ससोबत किकी डान्स व्हिडीओ #KikiChallenge असा हॅश टॅग वापरून शेअर केला होता. पण त्या व्हिडीओमध्ये त्याने गाडीतून न उतरताच हा व्हिडीओ तयार केला होता. पण फॅन्सनी त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन व्हिडीओ शेअर केले. आबुदाबी पोलिसांनी सोमवारी तीन सोशल मीडिया यूजर्सना किकी डान्स करण्यासाठी अटक केली आहे.
#Kiki कोण आहे?
आतापर्यंत हे समजू शकलेलं नाही की, किकी नक्की कोणाला म्हटलं आहे. ड्रेकने स्वतः याबद्दल काही खुलासा केलेला नाही. पण असे वाटते की, 'इन माई फीलिंग' गाण्यामध्ये कॅनडियन सिंगर केशिया केके चांटे चा उल्लेख किकी म्हणून केला आहे.