शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

केरळचा ऑटो ड्रायव्हर झाला १२ कोटी रुपयांचा धनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 08:12 IST

केरळमधील कोची येथील एका ऑटो ड्रायव्हरला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जयपालन असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने केरळ सरकारच्या ‘ओनम बंपर’चे तिकीट घेतले होते. 

नवी दिल्ली : केरळमधील कोची येथील एका ऑटो ड्रायव्हरला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जयपालन असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने केरळ सरकारच्या ‘ओनम बंपर’चे तिकीट घेतले होते. जयपालन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी काम करीत होता. त्यामुळे त्याला वेळच नव्हता. संध्याकाळी टीव्हीवर घोषित झालेला विजेता क्रमांक आपल्या तिकिटाचा आहे, हे त्याने पाहिले. अन् त्याची झोपच उडाली. त्याने संपूर्ण रात्र जागून काढली. पण, त्याचवेळी त्याने आपली शांतता ढळू दिली नाही. भावनांना आवर घातला. त्याने ही बातमी फक्त आपल्या आईला सांगितली. त्याने सकाळपर्यंत वाट पाहिली. सकाळी वृत्तपत्रात पुन्हा निकाल पाहून खात्री करून घेतली.जयपालनने सांगितले की, निकाल माहीत झाल्यानंतर माझा मेंदू पूर्णत: बधीर झाला. जणू विचारच थांबले. मी निकाल अनेकवेळा तपासला. आईला लॉटरी जिंकल्याचे सांगितले होते, पण रक्कम सांगितली नव्हती. जयपालनच्या पत्नीचे नाव मनी असून त्यांना दोन मुले आहेत. लॉटरी लागली तेव्हा पत्नी मनी आणि मोठा मुलगा वैशाख दोघेही ड्यूटीवर होते. धाकटा मुलगा विष्णू शिक्षणानिमित्त कोझिकोडेला होता. फक्त आई लक्ष्मी घरी होती. म्हणून तिला त्याने माहिती दिली.  

- पत्नी आणि मुलांना तर, आधी लॉटरी लागली या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. आपल्या एका नातेवाईकाला घेऊन तो बँकेत गेला तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनाही प्रथमत: त्याच्यावर विश्वास बसत नव्हता.- जयपालनने सांगितले की, या पैशातून मी माझ्या घराजवळच्या विष्णू मंदिराला देणगी देणार आहे. माझे कर्ज फेडणार आणि काही रक्कम माझ्या जवळच्या नातेवाईकांना देणार.

टॅग्स :MONEYपैसाKeralaकेरळ