शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल धमाका! ३५ वर्षानंतर घरात हलला पाळणा, ५५ व्या वयात महिलेने दिला तीन बाळांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:55 IST

केरळच्या मुवाटुपुझा गावात ५५ वर्षीय एका महिलेने एकाचवेळी तीन बाळांना जन्म दिला आहे. महिलेच्या लग्नाला ३५ वर्षे उलटून गेली होती.

आई होण्याचा अनुभव आपल्या देशात एका ठराविक वयातच बघायला मिळतो. जसजसं वय वाढतं शारीरिक समस्याही होतात. त्यात समाजातही जास्त वयात बाळांना जन्म देण्याला चांगल्या नजरेने बघितलं जात नाही. पण यात विचारात आता बदल येत असल्याचं दिसतं. 

केरळच्या मुवाटुपुझा गावात ५५ वर्षीय एका महिलेने एकाचवेळी तीन बाळांना जन्म दिला आहे. महिलेच्या लग्नाला ३५ वर्षे उलटून गेली होती. इतक्या वर्षात त्यांनी अनेकदा बाळासाठी प्रयत्न केले. पण आई होण्याचा आनंद त्यांना फारच उशीरा मिळाला. त्यांना  बाळ हवं होतं ते त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालं. ५५ वर्षीय सिसी आणि ५९ वर्षीय त्यांचे पती जॉर्जज एंटनी आनंदी आहेत.

सिसी या क्षणाला देवाचा आशीर्वाद मानतात.  त्यांच्यानुसार, त्यांना त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर मिळालं आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कपलने सांगितलं की, 'आम्ही एका बाळासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रार्थना करत होतो. पण आता आम्हाला जुळे नाही तर तिळे मिळालेत'. सिसी यांचे तिन्ही बाळ व्यवस्थित आहेत. त्यांना २ मुले आणि एक मुलगी झाली आहे.

त्यांना उशीर भलेही लागला असेल, पण त्यांनी आशा सोडली नव्हती. प्रार्थना तर सुरू होतीच सोबतच त्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात होत्या आणि वेळोवेळी उपचार घेत होत्या. त्यांनी परदेशातही उपचार घेतलो. दोघांचं लग्न १९८७ मध्ये झालं होतं. जॉर्ज हे गल्फमध्ये काम करत होते.

सिसी म्हणाल्या की, लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना बाळासाठी अनेक उपचार घेणे सुरू केले होते. सिसी म्हणाल्या की, आपला समाज असा आहे की, एखादी महिला आई होत नसेल तर तिच्याकडे वाईट नजरेने बघतात. अशात गेल्या ३५ वर्षांनी त्यांना अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. 

टॅग्स :KeralaकेरळJara hatkeजरा हटकेWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी