शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लॉटरी विक्रेत्यालाच लागली लॉटरी; विक्री न झालेल्या तिकिटानं रातोरात झाला करोडपती

By कुणाल गवाणकर | Updated: January 22, 2021 13:33 IST

लॉटरी विक्रेत्यानं जिंकले १२ कोटी; आता नवं घर बांधणार, कर्ज फेडणार

कोल्लम: आपण विक्री करत असलेल्या सर्व वस्तू विकल्या जाव्यात, असं प्रत्येक विक्रेत्याला वाटतं. केरळमधल्या कोल्लम तालुक्यात लॉटरीची तिकिटं विकणारे शराफुद्दीनदेखील त्याला अपवाद नाहीत. काही दिवसांपूर्वी तिकिटं विकत असताना शराफुद्दीन यांच्याकडे असलेली जवळपास सर्व तिकिटं विकली गेली. त्यांच्याकडे केवळ एकच तिकिट राहिलं होतं. मात्र तेच तिकीट शराफुद्दीन यांच्यासाठी लकी ठरलं. त्यांना तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली.४६ वर्षांचे शराफुद्दीन कोल्लममध्ये लॉटरीची तिकिटं विकतात. ते तमिळनाडूच्या सीमेजवळ असलेल्या कोल्लम तालुक्यातल्या अर्यानकावू जवळच्या इराविधारामपुरममध्ये वास्तव्यास आहेत. शराफुद्दीन आधी आखाती देशात काम करायचे. पण सात वर्षांपूर्वी ते मायदेशी परतले. त्यांच्या कुटुंबात एकूण सदस्य आहेत. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी शराफुद्दीन लॉटरीची तिकिटं विकतात.विक्री न झालेल्या तिकिटामुळे १२ कोटी रुपये जिंकलेल्या शराफुद्दीन आता या पैशातून घर बांधणार आहेत. याशिवाय डोक्यावर असलेलं कर्ज फेडून एक लहानसा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. शराफुद्दीन ९ वर्षे रियाधमध्ये होते. ते २०१३ मध्ये मायदेशात परतले. त्यानंतर त्यांनी अर्यानकावू परिसरात लॉटरी तिकिटं विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबात आई, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा आहे. शराफुद्दीन यांनी याआधीही लॉटरीची तिकिटं घेतली होती. त्यात त्यांना लहानलहान बक्षिसं मिळाली. मात्र पहिल्यांदाच त्यांना जॅकपॉट लागला आहे.मंगळवारी शराफुद्दीन लॉटरी संचलनालयाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी त्यांच्याकडे असणारं तिकीट अधिकाऱ्यांना दाखवलं. शराफुद्दीन यांना १२ कोटींची लॉटरी लागली आहे. यातले साडे सात कोटी रुपये त्यांना मिळतील. १२ कोटींमधून ३० टक्के रक्कम कर म्हणून कापली जाईल. तर १० टक्के एजंटचं कमिशन असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.