शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

हा आहे अमेरिकेतील सर्वात महागड्या घराचा मालक, घराची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:28 IST

जगातल्या महगाड्या घरांची किंमत नेहमीच चिंतेत असते. भारतात तर मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅंटिलिया घराची चर्चा असते.

जगातल्या महगाड्या घरांची किंमत नेहमीच चिंतेत असते. भारतात तर मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅंटिलिया घराची चर्चा असते. कारण हे घर जगातलं दुसरं सर्वात महाग घर आहे. पण अमेरिकेतील सर्वात महाग घर किती रूपयांचं असेल याचा विचार केला का? एका उद्योगपतीने अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये एक अपार्टमेंट खरेदी करून सर्वांनाच धक्का दिला आहे. या अपार्टमेंटची किंमत २३८ मिलियन डॉलर(१६९० कोटी रूपये) आहे. हे अमेरिकेत विकलं गेलेलं सर्वात महागडं घर झालं आहे. 

कुणी घेतलं हे घर?

हे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव केन ग्रिफिन असं आहे. केन अरबपती असून हेग फंड इन्व्हेस्टमेंट कंपनी सिटाडेलचे संस्थापक आहेत. हे त्यांनी विकत घेतलेलं चार मजली घर २२० सेंट्रल पार्क साउथमध्ये आहे. हा परिसर अमेरिकेतील सर्वात पॉश आणि महागडा परिसर मानला जातो. 

याआधीची महागडी घरे

सेंट्रल पार्क येथे असलेल्या या घराआधी अमेरिकेत २०१४ मध्ये एक घर १३७ मिलियन डॉलर(९७३ कोटी रूपये) ला विकलं गेलं होतं. चीनच्या एका हॉटेल मॅनेजमेंट कंपनीचे मालक टॉग-टॉग जाओ ने एका इमारतीच्या २७ व्या मजल्यावर १३.५ मिलियन डॉलर(९६ कोटी रूपये)ला खरेदी केलं होतं. 

केन ग्रिफिनच्या नावे अनेक महागडी घरे

५० वर्षीय केन लंडनमध्ये बकिंघम पॅलेसजवळ घर खरेदी करून चर्चेत आले होते. हे घर त्यांनी १२४ मिलियन डॉलर (८८० कोटी रूपये) ला खरेदी केले होते. बकिंघम पॅलेस हे जगातलं सर्वात महागडं घर आहे. हा महल इंग्लंडच्या राजघराण्याचा आहे. 

केन यांनी पहिल्यांदाच महागडं घर खरेदी केलं नाहीये. त्यांच्या नावावर याआधीही अनेक महागडी घरे आहेत. मिआमीमध्ये त्यांच्याकडे सर्वात महागडं घर आहे. हे घर त्यांनी २०१५ मध्ये ६० मिलियन डॉलरला खरेदी केलं होतं. तसेच गेल्यावर्षी त्यांनी शिकागोमध्ये ५९ मिलियन डॉलरला एक घर खरेदी केली. शिकागोमध्ये त्यांच्याकडे तीन घरे आहेत. फ्लोरिडामध्ये सहा तर हवाईमध्ये त्यांची दोन घरे आहेत.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका