शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ४९ रुपये अन् मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालक; रातोरात नशीब पालटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 15:34 IST

हा मेसेज आल्यानंतर मला आधी विश्वासच बसला नाही. मला नातेवाईकांनी फोन केले. त्याचसोबत आयजी ऑफिसमधूनही मला अभिनंदन करणारा कॉल आला

गोरखपूर - शहरातील सिकरीगंज परिसरात ड्यूटी करणाऱ्या होमगार्डचं नशीब रातोरात बदलेल असा विचारही कुणी केला नसावा. विवेकानंद सिंह असं या होमगार्ड जवानाचं नाव आहे. ४ तासांपूर्वी जेव्हा विवेकानंद झोपले होते तेव्हा त्यांचं आयुष्य सर्वसामान्य व्यक्तीसारखं फारसं काही खास नव्हते. रात्री १२ नंतर विवेकानंद यांनी फोन घेतला, मेसेज चेक केला तेव्हा त्यांचे नशिबच चमकलं. विवेकानंद ना केवळ कोट्यधीश बनला तर तो लग्झरी कारचा मालकही झाला होता. 

मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालकगोरखपूरच्या सिकरीगंज परिसरात तैनात असलेला होमगार्ड विवेकानंद सिंह ११२ नंबरची गाडी चालवत होता. तो आयपीएल मॅचवेळी ऑनलाईन अँपच्या माध्यमातून पैसे लावतो. मागील ६ महिन्यापासून तो असे करतोय. परंतु सोमवारी चेन्नई आणि लखनौ मॅचवेळी विवेकानंदने अँपच्या माध्यमातून ४९ रुपये लावले. त्यानंतर तो झोपी गेला. रात्री १२ वाजता डोळा उघडला तेव्हा त्याला आलेला मेसेज पाहून तो ताडकन उभा राहिला. त्याने १ कोटी रुपये आणि कार जिंकल्याचा हा मेसेज होता. 

IG ऑफिसनं केलं कौतुकहोमगार्ड विवेकानंद सिंह म्हणाला की, हा मेसेज आल्यानंतर मला आधी विश्वासच बसला नाही. मला नातेवाईकांनी फोन केले. त्याचसोबत आयजी ऑफिसमधूनही मला अभिनंदन करणारा कॉल आला. इतके पैसे जिंकले तरीही मी माझी ड्युटी करत राहणार आहे. ड्युटी माझे कर्तव्य आहे. जिंकलेले पैसे माझ्या भविष्यासाठी घर, जमीन खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. शेतीसाठी पैसेही वाचवेन. लॉटरीत इतके पैसे जिंकेन असं मला कधी वाटले नव्हते. देवाने जे दिले त्याने खूप खुश आहे. 

मुलांना पाहून पैसे लावायचे शिकलोविवेकानंद सुट्टीवर घरी आला होता. तेव्हा छोट्या मुलांना पाहून मी ऑनलाईन अँपमध्ये पैसे लावून टीम बनवायला लागलो. त्यात मला रस येऊ लागला. टाइमपास म्हणून टीम बनवली. मागील ६ महिन्यांपासून असे करतोय. प्रत्येक दिवशी १५० रुपये मॅचवर लावतो. सोमवारी चेन्नई आणि लखनौ मॅचवेळी फक्त ४९ रुपये लावले होते. त्यानंतर मी कोट्यवधी जिंकले. कारही मिळाली. लॉटरी जिंकल्यामुळे घरात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

टॅग्स :IPLआयपीएल २०२३