शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Valentine's Day: सध्या आहात कुठे? जिओकडून व्होडाफोन, आयडिया, एअरटेलची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 17:06 IST

जिओनं हटके स्टाईलमध्ये व्होडाफोन, आयडिया, एअरटेलला दिल्या शुभेच्छा

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनं बाजारात उतरताच धमाका केला. जिओनं अगदी स्वस्तात इंटरनेट सेवा देत सर्वच कंपन्यांच्या तोंडाला फेस आणला. त्यामुळे जिओशी स्पर्धा करताना एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांना घाम फुटला. दूरसंचार सेवेत दिग्गज आणि प्रस्थापित कंपन्यांना टक्कर देणाऱ्या जिओनं त्याच कंपनीची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत जिओनं एअरटेल, व्होडाफोन, आयडियावर निशाणा साधला. जिओनं स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा देत एअरटेल, व्होडाफोन, आयडियाला जबरदस्त टक्कर दिली. जिओमुळे या कंपन्यांना नुकसानदेखील सहन करावं लागलं. यानंतर आता व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत जिओनं या कंपन्यांची खिल्ली उडवली आहे. जिओकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. यातून इतर कंपन्यांना तुम्ही आहात कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. 'गुलाबाचा रंग लाल, वॉयलेट्सचा निळा, कधी शेजारच्या सिम स्लॉटमध्ये असणारे आता आहेत कुठे?' असा प्रश्न विचारत जिओनं इतर कंपन्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. जिओची सेवा इंटरनेट (4G Volte) वर आधारित आहे. त्यामुळे जिओचं सिम पहिल्या स्लॉटमध्येचं कार्यान्वित होतं. जिओ अतिशय कमी पैशात इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देतं. त्यामुळे अनेकजण जिओला प्राधान्य देतात. या कारणामुळे जिओचं सिम पहिल्या स्लॉटमध्ये ठेवलं जातं. सुरुवातीला जिओची सेवा फारशी चांगली नव्हती. त्यामुळे अनेकजण दुसऱ्या सिम स्लॉटमध्ये एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यासारख्या इतर कंपन्यांचं सिम ठेवायचे. मात्र जिओची सेवा सुधारल्यावर अनेकांनी दुसऱ्या स्लॉटमधून इतर कंपन्यांचं सिम काढून टाकलं. त्यामुळे या कंपन्यांचे ग्राहक कमी झाले. हाच संदर्भ घेत जिओनं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं इतर कंपन्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे जिओनं इतर कंपन्यांना ट्विटमध्ये टॅग करत त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेJioजिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेल