सोशल मीडियावर लोकांकडून करण्यात येणारे वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. दरम्यान, सध्या एका महिलेने केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या महिलेने तिच्या पतीने स्वप्नात येऊन तिला गर्भवती बनवले, असा दावा केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सध्याच्या विज्ञानाच्या युगात ही बाब अशक्य मानली जात आहे. तसेच लोक या महिलेची डीएनए चाचणी करण्याची मागणी करत आहेत.
या महिलेने केलेल्या दाव्यानुसार तिच्या पतीचं ११ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. मात्र तरीही ती आता गर्भवती राहिली, तसेच तिने मुलाला जन्म दिला आहे. महिलेने केलेल्या दाव्यानुसार तिचे इतर कुणासोबतही शारीरिक संबंध नाहीत. तसेच याला तिचे शेजारीपाजारी आणि कुटुंबीयांनीही दुजोरा दिला आहे.
मात्र या दाव्यांनंतर पतीचा मृत्यू होऊन एवढी वर्षे लोटल्यावर कुणाशी शरीरसंबंध न येता ही महिला गर्भवती कशी राहिली, तसेच ती तिच्या मुलाच्या खऱ्या बापाचं नाव लपवत तर नाही ना? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे. तिचे कुणाशी तरी शारीरिक संबंध असावेत, ती खोटं बोलतेय, असा आरोपही लोकांकडून केला जात आहेत. त्यानंतर या महिलेने सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. तिने सांगितले की, हो माझ्या पतीचं निधन झालं आहे. मात्र तरीही आजही ते माझेच आहेत. ते माझ्या स्वप्नात येतात. आम्ही एकत्र जेवण करतो. एकत्र भांडतो आणि एकत्रच झोपतो. त्यामुळेच मी गर्भवती राहिले. मला माहिती आहे की, माझ्या म्हणण्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र असंच घडलं आहे.
या महिलेने केलेला दावा शास्त्रीयदृष्ट्या खरा ठरणं शक्य नाही. दरम्यान, व्हारल होत असलेल्या व्हिडीओखाली युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एखादी महिला कुणी स्वप्नात आल्याने किंवा चमत्कारीकरीत्या गर्भवती राहणं शक्य नाही. दरम्यान, एका युझरने या महिलेच्या व्हिडीओखाली प्रतिक्रिया देताना या महिलेच्या मुलाचा खरा बाप कोण हे समोर येण्यासाठी सदर मुलाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे. तर एका युझरने लिहिले की,सदर महिला मूर्ख आहे आणि तिला वाटतं की, सगळं जग मूर्ख आहे. त्यामुळे ती सर्वांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या बोलण्यामध्ये काहीही खरं दिसत नाही आहे.