शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 10:12 IST

Japan Johatsu Tradition: जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत.

(Image Credit : www.businessinsider.in)

Japan Johatsu Tradition: भारतात लोक अनेकदा जीवनाला कंटाळून हिमालयात निघून जाण्याबाबत बोलतात. कारण तिथे त्यांना कुणी ओळखणार नाही आणि त्यांना शांततेने जगता येईल. पण एक देश असाही आहे जिथे भारतातील ही थीम अनेक दशकांपासून फॉलो केली जाते. हा देश म्हणजे जपान. इथे घर सोडून गायब होणाऱ्या लोकांना जोहात्सु असं म्हटलं जातं

जोहात्सुचा अर्थ

जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत. ते त्यांच्या जीवाला नुकसान पोहोचवण्याऐवजी एक नव्या जीवनाची सुरूवात करतात. या कामासाठी तर आता काही प्रायव्हेट कंपन्याही मदत करतात. ज्या एक ठराविक रक्कम घेऊन लोकांना वाफेसारखं गायब होण्यास मदत करतात.

ते परत येत नाहीत

अशात हे स्पष्ट आहे की, जोहात्सु म्हणजे जे लोक घरातून नोकरी किंवा दुकानासाठी बाहेर पडले ते घरी परत आलेच नाहीत. याच गायब होणाऱ्या लोकांना जोहात्सु असं म्हणतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये बघण्यात आलं की, कुटुंबियांनी खूप शोध घेऊनही या लोकांचा काही पत्ता लागत नाही. लोक असे अचानक होण्यामागच्या कारणांमध्ये परिवारातील लोक, नोकरीतील तणाव किंवा कर्ज असतं. अशा स्थितींमध्ये लोक गायब होण्याचा निर्णय घेतात.

कारण नेहमी नकारात्मक नसतं

या कामाला प्रोफेशन बनवणाऱ्या लोकांनी सांगितलं की, लोकांचं गायब होण्याचं कारण नेहमी नकारात्मक नसतं. अनेक लोक नवीन नोकरी सुरू करण्यासाठी किंवा नवीन लग्न करण्यासाठीही असं करतात. एका जपानी वेबसाइटवर प्रकाशित रिपोर्टनुसार, जोहात्सुवर अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे अभ्यासक हिरोकी नाकामोरिक म्हणाले की, या शब्दाचा वापर गायब होणाऱ्या लोकांसाठी पहिल्यांदा 1960च्या दशकात वापरला गेला होता.जपानी एक्सपर्ट्स सांगतात की, त्यांच्या देशात घटस्फोट कमी होण्यामागचं कारणही जोहात्सु आहे. कारण बरेच लोक इथे घटस्फोटाची कायदेशीर कारवाई करण्याऐवजी जोहात्सु बननं अधिक पसंत करतात.

ही कॉन्सेप्ट यशस्वी होण्याचं कारण हेही आहे की, जपानमध्ये प्रायव्हसीबाबत फार कठोर कायदे आहेत. इथे पोलीस बेपत्ता व्यक्तीचा तोपर्यंत शोध घेत नाहीत जोपर्यंत त्या व्यक्तीवर एखादा गुन्हा किंवा दुर्घटनेत असल्याचा संशय नसतो. अशात बेपत्ता व्यक्ती आपल्या एटीएममधून पैसे काढू शकतो. आपल्या जीवनातील सगळी कामे सहजपणे करू शकतो. जेव्हा कायदा मदत करू शकत नाही तेव्हा बेपत्ता व्यक्तीच्या परिवारातील लोक प्रायव्हेट डिटेक्टीवची मदत घेतात. त्यामुळे इथे डिटेक्टिव एजन्सींची संख्या आजूबाजूच्या देशांपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :JapanजपानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके