शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये पुन्हा एकदा त्सुनामीची चर्चा; या रहस्यमयी माशामुळे वाढली चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 15:18 IST

जपानमध्ये ११ मार्च २०११ साली आलेल्या भूकंपाने आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती हे सर्वांनीच पाहिलं होतं.

जपानमध्ये ११ मार्च २०११ साली आलेल्या भूकंपाने आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती हे सर्वांनीच पाहिलं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे २० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा भूकंप आणि त्सुनामीची चर्चा जपानमध्ये होऊ लागली आहे. आणि याचं कारण आहे समुद्रात आढळून आलेले दुर्मिळ मासे.

काही दिवसांपूर्वी जपानच्या ओकिनावा द्वीपाजवळ मच्छिमारांना समुद्रात १३ फूट लांब दोन ओरफिश दिसल्या होत्या. जपानमध्ये असं मानलं जातं की, हा मासा दिसल्यावर तिथे भूकंप आणि त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती येते. नंतर या माशांना पकडण्यात आले. मच्छिमारांचं म्हणणं आहे की, हे मासे फार रहस्यमयी आढळून आले. 

तज्ज्ञांनुसार, सामान्यपणे ओरफिश समुद्रात १ हजार ते ३ हजार फूट खोलीवर असतात. हे मासे समुद्र सपाटीवर तेव्हाच येतात जेव्हा समुद्रात काही हालचाल होते. या माशांकडे भूकंपाच्या संकेतसारखं पाहिलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसात जपानमध्ये मच्छिमारांना एकूण सात मासे मिळाले आहेत. 

याआधी ओरफिश नावाच्या माशांना जपानमध्ये समुद्र तटावर २०११ मध्ये पाहिलं गेलं होतं. त्यानंतर जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी आली होती. त्यात २० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच आता पुन्हा एकदा जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची चर्चा होऊ लागली आहे. असे असले तरी तज्ज्ञांनी मात्र जपानमध्ये भूकंप येणार असल्याचं नाकारलं आहे. त्यांचं मत आहे की, याचा काहीही पुरावा नाही की, हे मासे भूकंपाचा येणार असल्याचा संकेत देतात. काही पर्यावरणातील बदलांमुळे हे मासे कदाचित वर आले असतील. 

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटकेEarthquakeभूकंपfishermanमच्छीमार