शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

कौतुकास्पद! शेतीमुळे तरुणाचं नशीब फळफळलं; कष्टाच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:40 IST

आपल्या जमिनीवर ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि हा शेतीने काही दिवसांतच मोहम्मद अयूबचं नशीब फळफळलं.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां येथील सफा नगरी या छोट्याशा गावात राहणाऱ्या तरुणाने कमाल केली आहे. मोहम्मद अयूब असं या तरुणाचं नाव असून त्याने मेहनतीच्या जोरावर सरकारी नोकरीशिवाय देखील चांगले पैसे कमवू शकतो हे सिद्ध केलं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने नोकरी शोधली पण सरकारी किंवा खासगी ठिकाणी त्याला नोकरी मिळाली नाही. पण तो निराश झाला नाही. 

मोहम्मदने काही तरी वेगळं करण्याचा विचार केला. आपल्या जमिनीवर ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि हा शेतीने काही दिवसांतच मोहम्मद अयूबचं नशीब फळफळलं. त्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. तो त्यावर सध्या भाज्या पिकवतो. साधारण वर्षाला तो सहा लाख रुपये हे शेतीतून कमावतो. मोहम्मदने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भाज्यांची बाजारात मागणी आहे. त्याचीच तो शेती करतो. 

काश्मीरमध्ये सफरचंदाचं उत्पादन हे जास्त होतं. पण उत्पादन जास्त असल्याने त्याच्या किमतीत घसरण होते. या वेळी बाजारात सफरचंद हे 20 ते 25 रुपये किलोने विकलं जात आहे. त्यामुळेच त्याने मुळ्याची शेती करण्याचा विचार केला. यातून तो प्रतिकिलो 50 रुपये कमवत आहे. बेरोजगार तरुण अशापद्धतीने शेती करून चांगलं उत्पन्न मिळवू शकतात असं मोहम्मद अयूब याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :agricultureशेतीMONEYपैसा