शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

फायद्याचा कायदा... इथे हँगओव्हरसाठीही मिळू शकते सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:20 IST

कल्पना करा की, ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही बॉसला सांगितले की, घशात खवखव असल्याने मला सुट्टी हवी आहे. यावर इतक्या शिव्या मिळण्याची शक्यता असते की, कानातून जाळ निघावा.

(Image Credit : killcliff.com)

कल्पना करा की, ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही बॉसला सांगितले की, घशात खवखव असल्याने मला सुट्टी हवी आहे. यावर इतक्या शिव्या मिळण्याची शक्यता असते की, कानातून जाळ निघावा. पण तेच जर तुम्हाला हॅंगओव्हरसाठी आनंदाने सुट्टी मिळाली तर....? तुम्ही म्हणाल काय गंमत लावली राव....पण हे प्रत्यक्षात होणार आहे. पण भारतात नाही तर जर्मनीमध्ये.

जर्मनीमध्ये हॅंगओव्हर हा आजार असल्याचं ऑफिशिअली घोषित केलं आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी हॅंगओव्हरसाठी सुट्टी मिळू शकणार आहे. रात्रभर तुम्ही दारू ढोसत बसले असाल तर सकाळी डोकं पकडलेलं असतं, अशात ऑफिसमध्ये जाणं फारच शौर्याचं काम ठरतं. भारतात बॉसला सांगाल की, हॅंगओव्हर आहे ऑफिसला येऊ शकत नाही. तर बॉस हेच म्हणेल की, रात्रभर बोंबलत पार्टी केली आणि सकाळी सकाळी नाटक करतोय. जर रात्री पार्टी केलीही असेल पण सकाळी डोकं दुखत आहेच. म्हणजे डोकेदुखी हे अस्वस्थ व्यक्तीचं लक्षण आहे.

आपल्याकडे तर सर्दी-पळस्याला आजारच समजलं जात नाही. बॉस यावर फार फार तर 'काळजी घे' असं म्हणतील. पण सुट्टीची काही अपेक्षा ठेवू नका. आता हेच बघा ना तापही १०२ च्या वर असेल तरच ताप ताप मानला जातो. इतका ताप नसेल तर तो ताप मानला जात नाही.

आता समजा एखाद्याचं ब्रेकअप झालं तर तो काम करण्याच्या मानसिक स्थितीत नसेल. म्हणजे ती व्यक्ती मानसिक स्थिर नाही. आता त्याचं ब्रेकअप झालंय म्हणजे तो गममध्ये ड्रिंक करणार तर त्याला दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार. पण हे भारतात कधी होणार माहीत नाही. पण जर्मनीत हॅंगओव्हरची सुट्टी मिळू शकते.

हा निर्णय कोर्टाने एका खटल्यासंदर्भातील सुनावणीदरम्यान दिलाय. मद्यसेवन केल्यावर होणारं हॅंगओव्हर हा एक आजारच आहे. कोर्टाने हा निर्णय हॅंगओव्हर दूर करण्यासाठी पेय तयार करणाऱ्या कंपनी विरोधात सुनावला आहे. ही कंपनी हॅंगओवर एक आजार सांगून यावर उपचार करणारं 'एक अ‍ॅंटी हॅंगओव्हर ड्रिंक' विकत होती. आता कोर्टाच्या निर्णयामुळे जर्मनीमध्ये ऑफिशिअली हॅंगओव्हर हा एक आजार आहे. त्यामुळे सुट्टी मिळण्यास अडचण येणार नाही. तसेच कोर्टाने या अ‍ॅंटी-हॅंगओव्हर पेयावर बंदी आणली आहे.

टॅग्स :Germanyजर्मनीJara hatkeजरा हटके