शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातले तीन महिने अंधारात राहत होतं हे गाव, गावातील लोकांनी बनवला स्वत:चा 'सूर्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:22 IST

तुम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने डोळे, हात, पाय बनवल्याचे पाहिले असेलच. मात्र, इटलीतील या गावात लोकांनी त्यांचा सूर्यच बनवला.

सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. पण काही भाग असेही आहेत जिथे काही महिने सूर्यप्रकाशच पडत नाही. इटलीतील एक गावही असंच आहे. जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांनी स्वत:चा वेगळा 'सूर्य' बनवून घेतला. इथे सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने येथील लोकांनी जुगाड करून एक आर्टिफिशिअल सूर्य तयार  केला. तुम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने डोळे, हात, पाय बनवल्याचे पाहिले असेलच. मात्र, इटलीतील या गावात लोकांनी त्यांचा सूर्यच बनवला.

इटलीच्या विगल्लेना गावाला चारही बाजून डोंगराने वेढलं आहे. ज्यामुळे सूर्याचा प्रकाश या गावात पोहोचत नाही. हे गाव मिलानच्या उत्तर भागात १३० किमी खाली आहे. इथे साधारण २०० लोक राहतात. येथील लोकांनी बऱ्याच महिन्यांपासून सूर्याचं दर्शन घेतलं नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे सूर्याची एकही किरण पडत नाही. त्यामुळे गावातील एका आर्किेटेक्ट आणि इंजिनिअरने गावातील लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी आयडिया काढली. त्यांनी गावातील मेअरच्या मदतीने २००६ मध्ये विगल्लेगा गावात आर्टिफिशिअल सूर्य बनवला.

आर्किटेक्टने १ लाख यूरो खर्च करून ४० वर्ग किलोमीटरचा आरसा खरेदी केला आणि तो डोंगराच्या टोकावर लावला. हा आरसा अशाप्रकारे लावला की, त्यावर थेट सूर्याचा प्रकाश पडेल आणि त्याचं रिफ्लेक्शन गावावर पडेल. हा आरसा दिवसातील ६ तास लाइट रिफ्लेक्ट करतो ज्यामुळे गावात प्रकाश राहतो. 

हा आरसा डोंगराच्या दुसऱ्या बाजूने १,१०० मीटर उंचीवर लावण्यात आला आहे. या आरशाचं वजन साधारण १.१ टन आहे. हा आरसा कॉम्प्युटरच्या माध्यामातून ऑपरेट केला जातो. अशाप्रकारे विगल्लेना गावातील लोकांनी आपल्यासाठी एक नवा सूर्य बनवला.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सItalyइटलीJara hatkeजरा हटके