शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फक्त एका बंगल्याच्या किमतीत विकत मिळतंय बेट, तेही हॅलिपॅड अन् पेंटहाऊससह; वाचा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:52 IST

प्लाडा हे सुंदर स्कॉटिश बेट (Scottish Island) एका आलिशान बंगल्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण हे संपूर्ण बेट 3,50,000 पौंड म्हणजेच साडेतीन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीत विकलं जात आहे. हे बेट खरेदी करून तुम्ही तिथे तुमच्या सोयीनुसार राहू शकता.

आयुष्यात एखादा विलासी छंद जोपासायची इच्छा अनेकांना असते; पण परिस्थिती आणि बजेटच्या अभावी ते शक्य होत नाही. आता जगात कोणतीही व्यक्ती राजा-महाराजा नाही. त्यामुळे ती स्वतःसाठी संपूर्ण शहर विकत घेऊ शकत नाही; पण ही इच्छा पूर्ण करणं फारसं अवघड नाही. कारण स्कॉटलंडच्या (Scotland) सुंदर भूमीवरचं एक बेट (Island) एका आलिशान बंगल्याच्या किंमतीला विकलं जात आहे. आतापर्यंत फक्त राजघराण्यात जन्म घेतल्यानेच राजा होता येतं असं तुम्हाला वाटत असेलच मात्र आता प्रत्यक्षात ही संधी अगदी सहज मिळत आहे. हा विनोद नाही. प्लाडा हे सुंदर स्कॉटिश बेट (Scottish Island) एका आलिशान बंगल्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण हे संपूर्ण बेट 3,50,000 पौंड म्हणजेच साडेतीन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीत विकलं जात आहे. हे बेट खरेदी करून तुम्ही तिथे तुमच्या सोयीनुसार राहू शकता.

इतकं स्वस्तात संपूर्ण बेट का मिळतंय?स्कॉटलंडमधल्या ऐरन किनाऱ्यावरच्या आयलॅंड प्लाडा बाजारात हे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बेटावर सध्या कोणीही राहत नाही. खरं तर या बेटावर दीपगृह (Lighthouse), हेलिपॅड आणि राहण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. `डेली रेकॉर्ड`ने दिलेल्या वृत्तानुसार, एड्रोसन ते कॅम्पबेल्ट टाउनपर्यंत बोटीनं जाता येतं. हे बेट 700 मीटर लांब असून, 33 एकर परिसरात विस्तारलेलं आहे. हे बेट टिअर शेपमध्ये (Tear Shape) असून, ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. क्नाइट फ्रॅंकचे इस्टेट एजंट टॉम स्ट्युअर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, `या बेटावर पारंपरिक पद्धतीची घरं आहेत. तसंच 2.5 एकरावर हेलिपॅड उभारण्यात आलं आहे. या बेटावर पक्ष्यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत.`

3.36 कोटींमध्ये खरेदी करू शकता बेटसध्या या संपूर्ण बेटाची किंमत 3,50,000 पौंड म्हणजेच 3 कोटी 36 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. ब्रिटनमध्ये या किमतीत एक फ्लॅट मिळतो. भारताचा विचार करता, या किमतीत येथे एक चांगला बंगला 3.3 कोटींना मिळू शकतो. हे बेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जुनं लाइटहाउस कीपरचं घरदेखील मिळेल. या घरात पाच बेडरूम, दोन सीटिंग रूम्स आणि एक बाथरूम आहे. येथे 2.5 एकरावर एक बाग (Garden) आहे. या संपूर्ण बागेला दगडी संरक्षक भिंत आहे. या बागेत तुम्ही फळं आणि भाजीपाल्याचं उत्पादन घेऊ शकता. याशिवाय या परिसरात आणखी एक घर असून, त्यात बेडरूम, शॉवर रूम, किचन आणि सीटिंग रूम आहेत. या बेटावर राहणाऱ्या व्यक्तीचा दीपगृहाशी काहीही संबंध नसेल. कारण हे दीपगृह नॉर्दर्न लाइटहाउस बोर्डाच्या मुख्यालयातून ऑपरेट केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या बेटावर कोणीही राहत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके