शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हौस पडली महागात! महिलेने डोळ्यांमध्ये काढला टॅटू; आता झाली भयंकर अवस्था, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:17 IST

फक्त शरीरावरच नाही, तर डोळ्यांच्या बुबुळांमध्येही टॅटू काढला आहे.

सध्या टॅटूची क्रेझ पाहायला मिळत आहे. लोक शरीराच्या विविध भागांवर टॅटू काढून घेतात. काही जण आपल्या संपूर्ण शरीराला जणू नोटीस बोर्ड मानतात आणि अगदी डोक्यापासून पायापर्यंत टॅटू काढून घेतात. काही जण वर्ल्ड रेकॉर्डसाठी, तर काही जण प्रसिद्ध सेलिब्रिटीची कॉपी करून टॅटू काढतात. आयर्लंडमधल्या एका महिलेच्या बाबतीतही हेच घडलं. धक्कादायक बाब म्हणजे फक्त शरीरावरच नाही, तर डोळ्यांच्या बुबुळांमध्येही टॅटू काढला आहे. याचा परिणाम म्हणजे आता हळूहळू तिची दृष्टी नाहीशी होऊ लागली आहे. 

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 32 वर्षांची अनाया पीटरसन ही लॉची विद्यार्थिनी असून पाच मुलांची आई आहे. ती एंबर ल्यूक नावाच्या सोशल मीडिया इंफ्लुएंसरची खूप मोठी चाहती आहे. एंबर तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटूसाठी खूप प्रसिद्ध आहे. एंबर ल्यूकने डोळ्यांच्या पांढर्‍या भागावर म्हणजेच बुबुळांवर टॅटू काढला होता. तिचंच अनुकरण करून अनायानेही डोळ्यात टॅटू काढण्याचा विचार केला. अनायाच्या सात वर्षांच्या मुलीने दृष्टी जाण्याची शक्यता बोलूनही दाखवली होती. पण तिने मुलीचं ऐकलं नाही आणि 2020मध्ये डोळ्यात टॅटू काढला.

जुलै 2020मध्ये अनायाने उजव्या डोळ्यात टॅटू काढला. त्यानंतर अनेक दिवस डोळ्यांची जळजळ होत होती आणि ते कोरडेही पडले होते. तसंच तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. या सगळ्या गोष्टी माहीत असूनही तिने पाच महिन्यानंतर डाव्या डोळ्यातही टॅटू गोंदवून घेतला. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि काही महिने कोणतीही अडचण आली नाही; पण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक दिवस झोपेतून उठल्यानंतर तिचे डोळे मोठ्या प्रमाणात सुजले होते.

तिच्या डोळ्यांची सूज वाढत होती, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला तीन दिवस थेंबाद्वारे अँटीबायोटिक्स देण्यात आलं. यानंतर डोळ्यांची बायोप्सीही करण्यात आली. दृष्टी पूर्ववत व्हावी म्हणून डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. थोडी विश्रांती मिळाल्यावर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला; पण ती पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. डोळ्यांची जळजळ थांबली असली तरी टॅटूच्या रंगामुळे अनायाची दृष्टी हळूहळू कमी होत आहे. तसेच दृष्टी पूर्ण जाण्याचाही धोका आहे. दृष्टी कमी झाल्यामुळे आता अनायाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"