शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

"वाऱ्याची झुळूक आली अन् मी गरोदर राहिले; तासाभरात बाळंत झाले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:47 IST

इंडोनेशियातील महिलेचा अजब दावा; संपूर्ण शहरात बाळंतपणाची चर्चा

इंडोनेशियातील पोलीस सध्या एका विचित्र घटनेचा तपास करत आहेत. वाऱ्याची झुळूक आल्यानं गरोदर राहिल्याचा अजब दावा एका महिलेनं केला आहे. महिलेचा दावा ऐकून डॉक्टर चक्रावले आहेत. सिती झैनाह असं महिलेचं नाव असून ती २५ वर्षांची आहे. झैनाहची तक्रार ऐकून पोलीस बुचकळ्यात पडले आहेत.तिच बाप अन् तिच माय; आधी स्वत:चं सीमन फ्रिज केलं; आता लिंगबदल करून आई होणारवाऱ्याची झुळूक आली आणि त्यामुळे मी गरोदर राहिले. त्यानंतर तासाभरातच मी बाळंत झाले, असा अजब दावा सितीनं केला. सितीनं एका मुलीला जन्म दिला असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. इंडोनेशियातल्या पश्चिम जावा प्रांतातल्या सिआनजुरमध्ये ही घटना घडली. 'घराच्या हॉलमध्ये असताना खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. त्यानंतर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागलं. पोटदुखी हळूहळू वाढतच गेली,' असं सितीनं स्थानिक माध्यमांना सांगितलं.बाबो! ४ महिन्यांच्या या गायीला मिळाली २ कोटी रूपये किंमत, पण का?'पोटदुखी वाढत असल्यानं मी दवाखान्यात गेले. तिथे मी बाळंत झाले. मी एका मुलीला जन्म दिला', असं सितीनं माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. संपूर्ण प्रकार अवघ्या काही तासांत घडल्याचा दावा सितीनं केला. 'दुपारच्या प्रार्थनेनंतर मी बिछान्यावर झोपले होते. त्यावेळी खिडकीतून आलेली वाऱ्याची झुळूक माझ्या गुप्तांगात गेल्याचं मला जाणवलं. त्यानंतर पोटदुखी सुरू झाली,' अशी माहिती सितीनं दिली.कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्लावाऱ्याची झुळूक आल्यानं गरोदर राहिल्याचं आणि अवघ्या तासाभरात बाळंत झाल्याचं वृत्त काही वेळातच शहरात पसरलं. त्यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. सितीनं या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर कम्युनिटी क्लिनिकचे संचालक इमॅन सुलेमान यांनी प्रकरणाची अधिक माहिती घेतली. महिलेनं मुलीला जन्म दिला असून तिचं वजन २.९ किली आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे, असं सुलेमान यांनी सांगितलं. काही वेळा महिलांना त्या गरोदर असल्याचं समजत नाही. प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतरच ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते, असं ते पुढे म्हणाले.