शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

55 वर्षे शौचालयाशिवाय धावत राहिली भारतीय रेल्वे, 'या' एका तक्रारीनंतर सुरू झाली टॉयलेची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 20:03 IST

अतिशय रंजक आहे, भारतीय रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची स्टोरी...!

सध्या देशात बुलेट ट्रेनवर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात माध्यमांत सातत्याने बातम्याही येत असतात. पण आपल्याला माहीत आहे का, की आज आपण ज्या स्वरुपात भारतीय रेल्वे पाहत आहोत, ती पूर्वी तशी नव्हती. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर बरीच वर्षे तिच्यात शौचालयाची व्यवस्थाच नव्हती. अर्थात ती शौचालयाशिवाय धावत होती. मग भारतीय रेल्वेत शौचालयाची सुविधा कशी सुरू झाली? अतिशय रंजक आहे, भारतीय रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची स्टोरी...!

भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. मात्र, यावेळी रेल्वेमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती. शौचालयाची सुविधा नसल्याने रेल्वेने प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणी यायच्या. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर जवळपास 55 वर्षांनंतर, भारतीय रेल्वेमध्ये शौचालाची व्यवस्था सुरू करण्यात आली. याचे संपूर्ण श्रेय जाते, ओखिल चंद्र सेन नावाच्या एका बंगाली व्यक्तीला. त्यांच्याच एका तक्रारीनंतर रेल्वेमध्ये शौचालयाची सुविधा सुरू करण्यात आली. 

अशी आहे रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची कहाणी -भारतातील ट्रेनमध्ये 1909 साली टॉयलेटची सुविधी सुरू करण्यात आली. यापूर्वी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ स्थानकांवरच स्वच्छतागृहाची सुविधा मिळत होती. एकदा ओखिल चंद्र सेन नावाची एक व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असताना, शौचालय वापरण्यासाठी स्टेशनवर उतरली आणि त्याच दरम्यान त्याची ट्रेन चुकली. यानंतर ओखिल चंद्र सेन यांनी पश्चिम बंगालच्या सबिहगंज विभागीय कार्यालयाला पत्र लिहून ट्रेनमध्ये शौचालयाची सुवीधी देण्यासंदर्भात विनंती केली. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी ५० मैलांपेक्षा अधिक अंतर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा सुरू केली होती.

रेल्वे म्युझियममध्ये अजूनही आहे ते पत्र -ओखिल चंद्र सेन यांचे ते पत्र आजही दिल्ली येथील रेल्वे म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आलेले आहे. आपल्याला माहीतच असेल, की अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतीय रेल्वे, हे जगातील चौथा क्रमांकांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तसेच, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेwest bengalपश्चिम बंगाल