शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर जेवण आणि 'या' गोष्टी मिळतील मोफत; नियम व अधिकार जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 15:37 IST

Indian Railways : ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला कोणत्या सेवा मोफत देते,  त्याबद्दल जाणून घेऊया....

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून ते फूड डिलिव्हरी आणि इतर गोष्टींसाठी सुविधा प्रदान करते. दुसरीकडे, ट्रेनला उशीर झाल्यास तुम्हाला अनेक सुविधाही मोफत मिळतात. भविष्यात कधीतरी ट्रेनला उशीर झाला तर प्रवासी म्हणून तुम्हालाही काही अधिकार आहेत. अशाच एका अधिकाराबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला कोणत्या सेवा मोफत देते,  त्याबद्दल जाणून घेऊया....

जर तुमच्या ट्रेनला उशीर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला जेवण आणि सॉफ्ट ड्रिंक पुरवते. हे जेवण तुम्हाला आयआरसीटीसीकडून अगदी मोफत दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा अधिकार वापरून मोफत जेवण आणि  सॉफ्ट ड्रिंक मागवू शकता. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जेव्हा ट्रेन उशीरा येते तेव्हा प्रवाशांना आयआरसीटीसीच्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.

कोणत्या प्रवाशांसाठी मिळते ही सुविधाआयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते, मात्र ट्रेन 30 मिनिटे उशिराने आली तर जेवणाची सुविधा मिळेल असे नाही. केटरिंग पॉलिसीनुसार, ट्रेन दोन तास किंवा त्याहून अधिक उशिराने आल्यास मोफत जेवणची सुविधा दिली जाते. मात्र, ही सुविधा केवळ शताब्दी, राजधानी आणि दुरांतो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांनाच दिली जाते.

ट्रेनला उशीर झाला तर मोफत काय मिळेल?इंडियन एक्स्प्रेसमधील एका बातमीनुसार, चहा/कॉफी कॅटगरीमध्ये दोन बिस्किटे, चहा/कॉफी किट (7 ग्रॅम) चहा/कॉफी, मिल्क क्रीमर पाउच (5 ग्रॅम) दिले जातात. दुसरीकडे, नाश्ता आणि संध्याकाळच्या चहासाठी, 4-ब्रेड स्लाइस, 1-बटर चिपलेट (8-10 ग्रॅम), 1-टेट्रा पॅकमध्ये ज्यूस (200 मिली), चहा/ कॉफी किट आणि चहा/कॉफी, मिल्क क्रीमर पाउच (5 ग्रॅम) दिले जाते. दुसरीकडे, लंच/डिनरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भात (200 ग्रॅम), डाळ (100 ग्रॅम) (पिवळी मसूर/चोले) आणि लोणचे पाउच (15 ग्रॅम) किंवा याऐवजी तुम्ही 7 पुरी (175 ग्रॅम) मिक्स व्हेज/आलू भजी (150 ग्रॅम), लोणचे पाउच (15 ग्रॅम), मीठ आणि मिरपूड पाउच ऑर्डर करू शकतात.

टॅग्स :railwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसीfoodअन्न