शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway Fare: ट्रेनने प्रवास करता? मग जाणून घ्या तिकीट भाडे कसे ठरवले जाते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:14 IST

Indian Railway Fare: आज भारतभर इंडियन रेल्वेचे जाळे पसरले आहे. यातून दररोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात.

Indian Railway Fare: देशाला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडण्याचे काम भारतीय रेल्वेने केले आहे. भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरलेले आहे. यामुळे दररोज लाखो-करोडो लोकांना स्वस्त दरात प्रवास करता येतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, रेल्वेचे भाडे कसे ठरवले जाते. चला तर मग जाणून घेऊया...

तुम्ही अनेकदा ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी वेबसाईटचा वापर करता किंवा स्टेशनवर जाऊन तिकीत काढता. पण, याचे भाडे कसे ठरवले जाते? तर, तुमच्या ट्रेनच्या भाड्यात विविध शुल्क संलग्न आहेत. हे शुल्क तुमच्या ट्रेनच्या प्रकारावर अवलंबून असतात. शताब्दी गाड्यांसाठी वेगळे शुल्क आहे, तर राजधानी, एक्स्प्रेस आणि इतर गाड्यांसाठी वेगळे शुल्क आहे. आता यामध्ये अंतर शुल्क, आरक्षण शुल्क, जीएसटी आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याआधारे तुमचे ट्रेनचे भाडे ठरवले जाते.

अशा प्रकारे तुमचे भाडे मोजले जातेतुमच्या ट्रेनच्या भाड्यामध्ये किलोमीटर हा सर्वात मोठा घटक आहे. तुम्हाला किती किलोमीटर प्रवास करायचा आहे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. रेल्वे भाड्याचे अंतर अनेक श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. जसे 1-5, 6-10, 11-15, 16-20, 21-25 आणि असेच 4951-5000 किमीचे वर्ग आहेत. तुम्ही प्रवास करत असलेल्या अंतरानुसार तुमचे भाडे ठरवले जाईल.

रेल्वेच्या भाड्याची संपूर्ण माहिती भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर आहे. तुम्ही संपूर्ण डिटेल किंवा तिकीट ब्रेकअप पाहू शकता. यासाठी भारतीय रेल्वेच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला रेल्वे बोर्ड विभागात जावे लागेल आणि तेथे तुम्हाला कोचिंग विभागात भाड्याची माहिती मिळेल.

बस, टॅक्सीच्या तुलनेत ट्रेनचा प्रवास स्वस्त ट्रेनच्या भाड्याची तुलना बस, टॅक्सी किंवा इतर सार्वजनिक वाहनांशी केली, तर ट्रेनने प्रवास करणे खूपच स्वस्त आहे. यामध्ये तुम्हाला टोल, पेट्रोल किंवा इतर पैसे खर्च करावे लागत नाहीत. समजा तुम्ही लखनऊहून दिल्लीला कॅबने येत असाल तर तुम्हाला किमान 8 हजार रुपये खर्च करावे लागतील. तर, फक्त 1000 किंवा 1200 रुपयांमध्ये 6 तासात ट्रेनने दिल्लीला पोहोचू शकता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स