शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमुळे गमावली त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता, विद्यार्थ्याने ठोकला २० कोटी रूपयांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 13:11 IST

आपण सर्वांना हे माहीत आहे की, उच्च शिक्षण मिळवणं हे काही सोपं नसतं. पुस्तकांचं ओझं, रोजच्या असायन्मेंट, परीक्षेचा दबाव या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी नेहमी तणावात राहतात.

आपण सर्वांना हे माहीत आहे की, उच्च शिक्षण मिळवणं हे काही सोपं नसतं. पुस्तकांचं ओझं, रोजच्या असायन्मेंट, परीक्षेचा दबाव या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी नेहमी तणावात राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये पीएचडी करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्यासोबत असंच काहीसं झालं.५२ वर्षीय भारतीय विद्यार्थी कुलदीप मानने दावा केला आहे की, त्याने २०१५ मध्ये टाउनविले कॅम्पसमध्ये सोशल सायन्स पीएचडी कोर्ससाठी अर्ज केला होता आणि यासाठी त्याला २० हजार डॉलर म्हणजेच साधारण १४ लाख रूपये भरले होते. जेव्हा त्याने दोन विषयांसोबत अभ्यासक्रम सुरू केला तेव्हा विश्वविद्यालयाने त्याच्यावर साहित्यचोरीचा आरोप लावून त्याचं अ‍ॅडमिशन रद्द केलं. 

mensxp.com या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, एका आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेलसोबत मान याने बोलताना सांगितले की, विश्वविद्यालयाने माझ्यासोबत अशाप्रकारचा छळ केला नसता तर माझं करिअर उद्धस्त झालं नसतं. आता माझ्याकडे पीएचडी डिग्री असती.

(Image Credit : sbs.com.au)

कुलदीप मानने पुढे सांगितले की, विश्वविद्यालयाने माझ्यासोबत जे केलं त्यामुळे माझं सगळंकाही प्रभावित झालं आहे. इतका की, मला माझ्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचीही इच्छा होत नाहीये. मी फार तणावात राहतो. माझ्यासोबत याआधी असं कधी झालं नव्हतं'.

(Image Credit : mensxp.com)

मान याने यासाठी क्वींसलॅन्डमधील जेम्स कुक विश्वविद्यालयावर ३ मिलियन डॉलर म्हणजेच साधारण २० कोटी ९० लाख रूपयांचा दावा ठोकला आहे. त्याचा दावा आहे की, विश्वविद्यालयाने त्याला इतका तणाव दिला की, त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची त्याची क्षमता गमावली आहे. 

(Image Credit : Nine News, Queensland)

कुलदीपने क्वींसलॅंडच्या सुप्रीम कोर्टात २० पानांचे कागदपत्र सादर केले. त्यात त्याने संभावित गमावलेलं उत्पन्न आणि झालेला मानसिक त्रास याचा दावा ठोकला आहे. त्यासोबतच त्याने असेही सांगितले की, या मानसिक त्रासामुळे माझ्या पार्टनरसोबत माझं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. मानने आशा व्यक्त केली आहे की, सुप्रीम कोर्टाकडून त्याला नक्की न्याय मिळणार, तसेच त्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा मिळेल.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाInternationalआंतरराष्ट्रीय