शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

Indian Currency: कागद नव्हे, 'या' खास गोष्टीपासून तयार होते भारतीय नोट; जाणून आश्चर्य वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:43 IST

Indian currency notes not made from paper : भारतीय रिझर्व बँक (RBI) करन्सी नोट तयार करताना कागदाचा वापर करत नाही. मात्र, अनेकांना असे वाटते, की त्यांच्या खिशातील नोट, ही कागदापासूनच (Paper) तयार करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँक (RBI) करन्सी नोट तयार करताना कागदाचा वापर करत नाही. मात्र, अनेकांना असे वाटते, की त्यांच्या खिशातील नोट, ही कागदापासूनच (Paper) तयार करण्यात आली आहे. जर आपल्यालाही, असेच वाटत असेल, तर आज आम्ही आपल्याला यासंदर्भात सविस्तर माहिती देत आहोत.

कापसाचा होतो वापर - आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, की भारतासह इतर अनेक देश करन्सी नोट तयार करण्यासाठी कापसाचा वापर करतात. याचे कारण म्हणजे, कापसाची (Cotton) काही खास वैशिष्टे. यात, ते वजनाला हलके असणे, अधिक काळ टिकू शकणे आमि प्रिंट करण्यायोग्य असणे, अशा काही वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. आरबीआयनुसार (RBI) नोट प्रिंट करण्यासाठी 100 टक्के कापसाचा वापर केला जातो.  

फक्त आरबीआयलाच आहे अधिकार -करन्सी नोटा तयार करण्यासाठी कॉटन, लिनन (Linen) आणि इतर गोष्टींचे प्रमाण बँकेने गुप्त ठेवले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या कलम 22 नुसार, केवळ रिझर्व्ह बँकेलाच  (Reserve Bank) भारतामध्ये करन्सी नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. अर्थात रिझर्व्ह बँकेशिवाय इतर कुणीही, असे करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

अमेरिका देखील अशाच फॉर्म्युल्याचा करते वापर -अमेरिका देखील आपल्या करन्सी नोटा तयार करण्यासाठी अशाच प्रकारचा फॉर्म्युला वापरते. एका रिपोर्टनुसार, अमेरिका 75% कॉटन आणि 25% लिननचा वापर करते.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकcottonकापूस