Potato Protest: बटाट्यांचा वापर फार पूर्वीपासून वेगवेगळे पदार्थ आणि भाजी बनवण्यासाठी केला जातो. बटाट्याची भाजी तर अनेकांना रोज लागतेच लागते. आठवड्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा बटाटे प्रत्येक घरात बनतात. बटाट्यांशिवाय फ्रेंच फाइज खाण्याचा तर विचारही करवत नाही. पण एक वेळ अशीही होती जेव्हा फ्रान्समध्ये बटाटे बॅन करण्यात आले होते. बटाट्याच्या शेतीवर बंदी घालण्यात आली होती. १७४८ आणि १७७२ दरम्यान इथे बटाट्यांवर जास्त विश्वास ठेवला जात नव्हता. त्यावेळी लोक बटाट्यांना घाबरत होते आणि त्याचा विरोध करत होते. याचं कारण वाचाल तर विश्वास बसणार नाही.
फ्रान्स बटाट्यांना का घाबरत होता?
१६ व्या शतकात जेव्हा अमेरिकेहून बटाटे यूरोपमध्ये आणण्यात आले, तेव्हा त्यांकडे शंकेच्या नजरेनं पाहिलं जात होतं. फ्रान्समध्ये ही शंका १८व्या शतकापर्यंत थेट दुश्मनीत बदलली. लोकांना बटाट्याची भीती वाटण्याचं कारण एक आजार होता. फ्रान्समधील लोकांना असं वाटत होतं की, बटाटे खाल्ल्याने कोड होतो. कारण त्यावेळी बटाट्यांचं पीक हे नवीन होतं आणि जमिनीखाली ते पिकवले जात होते. त्यामुळे बटाट्यांकडे आजार आणि बेकार या दृष्टीने पाहिलं जात होतं.
त्यासोबतच बटाट्यांना विरोध करण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे धार्मिक कारण. बायबल या धर्मग्रंथात बटाट्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे काही ख्रिश्चन धर्मगुरू आणि लोकांनी असा तर्क दिला की, बटाटा हा ख्रिश्चन लोकांसाठी चांगला नाही. बऱ्याच लोकांसाठी बटाटे न खाण्याचं हेच एक मुख्य कारण होतं. त्याशिवाय बटाटे हे जमिनीखाली येतात, त्यामुळे हे सैतानाचं खाणं किंवा घाणेरडं खाणं मानलं जात होतं. त्यामुळे बटाटे त्यावेळी मनुष्यांनी खाण्याऐवजी प्राण्यांनाच अधिक खायला दिले जात होते.
बटाट्यावर कायदेशीर बंदी
मोठ्या प्रमाणात भीती आणि चुकीच्या माहितीमुळे फ्रान्सने १७४८ आणि १७७२ दरम्यान काही भागांमध्ये बटाट्याच्या शेतीवर अधिकृत बंदी आणली होती. अधिकाऱ्यांचं असं मत होतं की, हे पीक असुरक्षित आहे आणि लोकांच्या आरोग्याचं नुकसान करतं. महत्वाची बाब म्हणजे हे अशावेळी झालं जेव्हा यूरोपमध्ये अनेकदा खाण्याची कमतरता आणि दुष्काळाचा सामना करावा लागत होता.
कुणी बदललं फ्रान्स मत?
पण फ्रान्सच्या विचारात पुढे बदल झाला तो एक फ्रेंच फार्मासिस्ट आणि अॅग्रोनॉमिस्ट अँटीनो ऑगस्टिन पारमेंटिअर यांच्यामुळे. दुष्काळात उपासमार रोखण्यासाठी त्यांनी बटाट्यांची क्षमता ओळखली. पण विरोध करणाऱ्यांसोबत थेट वाद घालण्यापेक्षा त्यांनी सायकॉलॉजीचा वापर केला. त्यांनी बटाट्याची शेती केला आणि दिवसा शाही सैनिकांना शेताची रखवाली करण्यास सांगितली. यामुळे लोकांमध्ये असा विचार गेला की, बटाटे किंमती आहेत. रात्री त्यांनी गुपचूप गार्ड हटवले. उत्सुक गावातील लोकांनी बटाटे चोरी करणं सुरू केलं. त्यांना वाटू लागलं की, बटाटे गरजेचे आणि दु्र्मीळ आहेत, त्यामुळे त्यांनीच याची शेती सुरू केली.
पुढे बदलत्या काळानुसार बटाटे फ्रान्सच्या आहारातील महत्वाचा भाग बनले. बटाट्यांनी येथील लोकांना दुष्काळासोबत लढण्यास मदत केली आणि शेवटी फ्रान्समधील सगळ्यात आवडत्या गोष्टींपैकी एक बनले. आज फ्रेंच फ्राइज, मॅश केलेले बटाटे आणि ग्रिटेनसारख्या डिश खूप प्रसिद्ध आहेत.
Web Summary : France once banned potatoes due to fears of disease and religious beliefs. A clever pharmacist, Parmentier, used reverse psychology to make potatoes desirable, ending the ban and famine.
Web Summary : फ्रांस ने कभी बीमारी और धार्मिक मान्यताओं के डर से आलू पर प्रतिबंध लगा दिया था। एक चतुर फार्मासिस्ट, पारमेंटियर ने आलू को वांछनीय बनाने के लिए उल्टी मनोविज्ञान का उपयोग किया, जिससे प्रतिबंध और अकाल समाप्त हो गया।