शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४ दिवसांचा फक्त १ प्रवास, देशात सर्वात जास्त किमी अंतर कापते 'ही' ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 16:13 IST

३ वर्षांनंतर भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च स्वत: पेलण्यास समर्थ ठरली आहे

भारतात रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे. देशातील बहुतांश लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो वा खडतर प्रदेश देशात रेल्वे नेटवर्क पोहचले आहे. परंतु तुम्हाला माहितीये का? असा कोणता रेल्वे मार्ग आहे जिथे देशात सर्वात मोठा प्रवास करणारी रेल्वे धावते? चला जाणून घेऊया. 

देशात सर्वात लांबीचा प्रवास करणाऱ्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस आहे. जी डिब्रूगडहून कन्याकुमारीपर्यंत धावते. ही ट्रेन जवळपास ८२ तासांत ४ हजार १५० किमीहून अधिक अंतर कापते. या ट्रेनचा नंबर १५९०६ विवेक एक्सप्रेस असून डिब्रूगडहून संध्याकाळी १९.२५ मिनिटांनी ही ट्रेन सुटते. डिब्रूगडहून ४ हजार १५४ किमी प्रवास करून चौथ्या दिवशी रात्री १० वाजता ट्रेन कन्याकुमारीला पोहचते. ट्रेनचा हा प्रवास १२ हून अधिक राज्यातून जातो. 

प्रवासावेळी कोणत्या मोठ्या स्टेशनवरून ट्रेन जाते?आसामच्या डिब्रूगडहून सुटलेली ही ट्रेन तामिळनाडूच्या कन्याकुमारीपर्यंत धावते. वेगवेगळ्या राज्यातून ती ट्रेन प्रवास करते. डिब्रूगड ते कन्याकुमारी या दरम्यान ही ट्रेन दिमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव कोकाराझार, न्यू अलीपूरद्वार, न्यू कुचबिहार, न्यू जलपाईगुडी, किशनगंज, मालदा टाउन, वर्धमान जंक्शन, बालासोर कटक भुवनेश्वर, विशाखापट्टनम, विजयवाडा, नेल्लोर, कोयंबटूर, एर्नाकुलम आणि त्रिवेंद्रम अशा प्रमुख स्थानकांवरून ती चौथ्या दिवशी कन्याकुमारी स्टेशनला पोहचते. प्रवासी वाहतुकीतून कमाईतून रेल्वे मालामालआर्थिक वर्ष २०२२-२३ या काळात रेल्वेला विक्रमी  २.४० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा महसूल ४९ हजार कोटी रुपयांनी जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ६१% वाढ झाली आहे. ३ वर्षांनंतर भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च स्वत: पेलण्यास समर्थ ठरली आहे. महसुलातील वाढ आणि खर्चाचे काटेकारे व्यवस्थापन यामुळे परिचालन गुणोत्तर ९८.१४ टक्के ठेवण्यात रेल्वेला यश आले. सर्व महसुली खर्चाची पूर्तता केल्यानंतर रेल्वेने भांडवली गुंतवणुकीसाठी ३,२०० कोटी रुपये आपल्या अंतर्गत स्रोतातून उभे केले आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वे