Weird Rituals : भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लग्नासंबंधी वेगवेगळ्या प्रथा असतात. या प्रथा फार आधीपासून चालत आल्या आहेत. भारताप्रमाणे परदेशातही लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. इंडोनेशियामध्येही लग्नासंबंधी अशीच एक अजब परंपरा आहे. ज्याबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. इथे लग्नानंतर नवरी-नवरदेव तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाहीत. चला जाणून घेऊ कारण...
इंडोनेशियामध्ये लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याला टॉयलेटला जाण्यास बंदी असते. हा येथील एक अनोखा रिवाज आहे. हा रिवाज टीडॉन्ग समुदायातील लोक पाळतात. या समुदायातील लोक या रिवाजाला फार महत्वपूर्ण समजतात. या रिवाजानुसार नवीन जोडपं तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही. असे केल्यास तो अपशकुन मानला जातो.
स्थानिक लोकांनुसार लग्न ही एक पवित्र प्रथा आहे. आणि अशात ते लोक टॉयलेटला गेल्यास त्यांची पवित्रता भंग पावते. सोबतच नववधू वर याने अशुद्ध होतात. इंडोनेशियामध्ये ही प्रथा पाळण्याचं आणखी एक कारण म्हणजे नववधू आणि वराला नजर लागू नये हेही आहे. त्यांचं असं माननं आहे की, टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. ते त्यांच्या शरीरातील घाण काढतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये नकारात्मक शक्ती असतात. लग्न झाल्यानंतर लगेच टॉयलेटला गेल्यास ती नकारात्मकता नव्या जोडप्यामध्येही प्रवेश करते.
इतकेच नाहीतर या लोकांची अशीही धारणा आहे की, लग्नानंतर लगेच टॉयलेटचा वापर केल्यास नवीन जोडप्याचं नातंही धोक्यात येतं. कधी कधी नातं तुटतं. दोघांनाही टॉयलेटला जावं लागू नये म्हणून दोघांनाही खाण्यासाठी कमी दिलं जातं. समुदायातील सर्व लोक हा रिवाज काटेकोरपणे पाळतात.
अनेकदा तर नातं तुटण्याचीही वेळ येते. त्यामुळे या समुदायातील लोक या मान्यतेबाबत फार जागरूक आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यात अशीही मान्यता आहे की, हा रिवाज तोडला तर जोडप्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे ते पूर्ण काळजी घेतात की, नवरी-नवरदेवाला या रिवाजामुळे कोणतीही अडचण होऊ नये. तसेच त्यांनी शौचालयाचा वापर करू नये. त्यासाठी त्यांना कमी खायला आणि प्यायला दिलं जातं.