शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टीनएजर्संना जास्त वेळासाठी झोपू दिलं तर अर्थव्यवस्थेते पडेल 5319 अब्ज रूपयांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:18 IST

टीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल.

ठळक मुद्देटीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल, टीनएजर्स जर जास्त वेळ झोपू दिलं तर आयुष्यातील विद्यार्थी कमाईमध्ये डॉलर 17,500 ने म्हणजेच अकरा लाखापेक्षा जास्त रक्कमेची भर पडेल, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई, दि. 15- तरूण मुलं जास्त झोपतात अशी ओरड नेहमी ऐकु येत असते. जास्त झोपण्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त असतात, असंही नेहमी आपण ऐकत असतो. पण टीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल, अशी एक बाब समोर आली. टीनएजर्स जर जास्त वेळ झोपू दिलं तर आयुष्यातील विद्यार्थी कमाईमध्ये डॉलर 17,500 ने म्हणजेच अकरा लाखापेक्षा जास्त रक्कमेची भर पडेल, असं द न्यूयॉर्क टाइम्सने अहवालात म्हंटलं आहे.

युएसमधील काही शाळा सकाळी साडेआठच्या सुमारास सुरू होतात. तसंच तेथिल  90 टक्के उच्च माध्यमिक शाळा आणि 80 टक्के माध्यमिक शाळा साडे आठच्या आधीही सुरू होतात. पण जर या शाळेच्या वेळेमध्ये बदल करून उशिराचा वेळ ठरवला तर तो मुलांनी दोन महिन्यांचा जास्त अभ्यास केल्याच्या बरोबरची आहे. याचाच अर्थ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने जास्त ज्ञान मिळविल्यासारखा आहे. जर विद्यार्थ्यांना जास्त वेळासाठी झोपू दिलं तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असून अर्थव्यवस्थेत 83 बिलियन डॉलरची (5319 अब्ज रूपये) भर पडेल. सहा इतर अभ्यासानुसार, जर शाळेची वेळ नियमीत वेळेपेक्षा 25 ते 60 मिनीट उशिराची असेल तर त्या मुलाला सकाळी 25 ते 77 मिनिटांची झोप जास्त घेता येइल. 

पण यामध्ये इतर अनेक मुद्देही आहेत तेसुद्धा अहवालात नमुद करण्यात आले आहेत. मुलांना जास्त वेळ झोपू देण्यासाठी त्यांच्या पालकांना काही तोटे सहन करावे लागतील. पहिला तोटा म्हणजे प्रवासखर्चात होणारी वाढ. शाळेची वेळ जर उशिराची असेल तर जास्त रहदारीच्या वेळेत विद्यार्थ्याला प्रवास करावा लागेल अर्थातच प्रवासासाठी येणारा खर्च यामुळे वाढेल. शाळा उशिरा सुरू झाली तर सुटायची वेळही उशिराशी असेल. त्यामुळे पालक ऑफिसवरून घरी जाताना मुलांना शाळेतून घेण्याचा विचार करत असतील, तर तेही सोपं नाही. कारण शाळेची वेळ आणि पालकांची ऑफिसवरून निघायची वेळ सारखी होणार नाही. याव्यतिरिक्त, जास्त रहदारीच्या वेळी मुलाला प्रवास करावा लागणार असल्याने प्रति विद्यार्थी  150 डॉलर खर्च वाढेल, तर शाळांनासुद्धा याचा तोटा होइल. पायाभूत सुविधांसाठी शाळांचे सुमार डॉलर 110,000 खर्ची होतील. तर दुसरीकडे, मुलांना जास्त झोप मिळाली तर त्याच्या शैक्षणिक यशात आणि विद्यार्थी कमाईमध्येही भर पडेल. विद्यार्थ्यालाच याचा फायदा होणार असल्याचं अहवालात म्हंटलं आहे.