शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मंडपात नवऱ्याचं गुपित उघड झालं; मैत्रिणींच्या सांगण्यावरुन नवरीनं थेट लग्नच मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 09:33 IST

उत्तर प्रदेशातील इटावा येथे ध्यानपूरा गावात रहिवासी महेशनं त्यांच्या मुलीचं लग्न बिधूना गावातील अजय कुमारसोबत निश्चित केले होते.

इटावा – लग्न म्हटलं तर दोन कुटुंब एकत्र येतात. नवरा-बायको आपल्या भावी आयुष्याबद्दल नवनवीन स्वप्न रंगवत असतात. लग्न म्हटलं तर दोन जीवांचं मिलन. नात्यांमधील विश्वास. पण उत्तर प्रदेशात जे घडलं ते पाहून सगळेच हैराण झाले. पती-पत्नीच्या नात्याची सुरुवात होण्याआधीच विश्वासघात झाल्याचं उघड झालं. याठिकाणी नवरदेव वऱ्हाडासोबत लग्न मंडपात आला आणि त्याठिकाणी नवरीला नवऱ्याचं गुपित कळालं अन् लग्न मोडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील इटावा येथे ध्यानपूरा गावात रहिवासी महेशनं त्यांच्या मुलीचं लग्न बिधूना गावातील अजय कुमारसोबत निश्चित केले होते. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नाच्या आधीच्या सर्व विधी पार पडल्या. दोन्ही कुटुंब आनंदित होतं. त्यानंतर २२ फेब्रुवारीला बिधूनाहून अजय कुमार वऱ्हाडी मंडळींसोबत नवरीच्या गावी पोहचला. नवरदेव थाटामाटात घोड्यावर बसून स्वार होता. बँड बाजा वाजत होता. वऱ्हाडातील हौसी मंडळी नाचत होती.

नवरीच्या दाराजवळ नवऱ्याचं वऱ्हाड पोहचताच कुटुंबीयांना नवरदेवाचं स्वागत केले. त्यानंतर लग्न मंडपात नवरी मुलगी स्टेजवर पोहचली तेव्हा अचानक नवरीच्या मैत्रिणींना नवऱ्याला पाहून काहीतरी संशय आला. कुजबूज सुरु झाली. नवऱ्यानं चेहऱ्याची सर्जरी केली होती त्याचसोबत नवऱ्याचं टक्कल पडलं होतं, त्याच्या डोक्यावर केस नव्हते तर विग लावून तो आला होता. मैत्रिणींनी नवरीला ही गोष्ट निदर्शनास आणून दिलं त्यानंतर लग्न मंडपात गोंधळ उडाला.

वडिलांसोबत नवरी पुन्हा माघारी फिरली

नवरीच्या नवऱ्याचं गुपित कळाल्यानंतर तातडीनं तिने या लग्नास नकार दिला. लग्न अचानक मोडल्यानं सुरुवातीला कुणालाच काही कळेना. तेव्हा नवरा-नवरी यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर नवरी तिच्या वडिलांसोबत लग्न मंडपातून माघारी परतली. हा वाद इतका वाढला की मंडपात पोलिसांना बोलावलं लागलं. पोलिसांनी साम्यंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नवरी मुलीनं लग्नास नकार दिल्यानं कुणाचंही काही चाललं नाही. अखेर नवरदेव वऱ्हाडी मंडळीसोबत पुन्हा गावी निघाला. नवऱ्याचं सत्य नातेवाइकांना समजताच त्यांनाही धक्का बसला.