शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

पत्नीला सरप्राईज देण्यासाठी टॅटू काढायला गेला पण ही एकच चूक पडली आयुष्यभरासाठी महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 19:32 IST

काहीतरी जगावेगळं करून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पती टॅटू काढायला गेल्यावर असं काही घडलं की ही चूक आता आय़ुष्यभर लक्षात राहणारी ठरली.

आपल्या लग्नाची तारीख (Wedding Date) हातावर गोंदवून (Tattoo) पत्नीला सरप्राईज (Surprise to wife) देण्याच्या बेतात असणाऱ्या पतीची चांगलीच (Wrong tattoo) फजिती झाली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पती आणि पत्नी (Husband and wife) दोघांनीही एकमेकांना गिफ्ट (Gift) देण्याचा निर्णय घेतला होता. काहीतरी जगावेगळं करून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पती टॅटू काढायला गेल्यावर असं काही घडलं की ही चूक आता आय़ुष्यभर लक्षात राहणारी ठरली.

Tiktok वरून एका तरुणानं स्वतःच्या फजितीची कहाणी शेअर केली आहे. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे एका वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि तो अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तरुणाच्या पत्नीनं तिच्या रिंग फिंगरवर तरुणाच्या नावाचं पहिलं अक्षर गोंदवलं आणि त्याला सरप्राईज दिलं. आता वेळ होती तरुणाची.

या तरुणाला लग्नाची तारीख गोंदवायची होती १ जानेवारी २०१९, म्हणजेच 1.01.19. ही तारीख त्यानं टॅटू आर्टिस्टला लिहून दिली. मात्र गडबडीत टॅटू आर्टिस्टनं ही तारीख चुकवली आणि त्याच्यावर लिहिलं गेलं 11.919. हातावर गोंदवलं जात असताना तरुणाचं त्याच्याकडं लक्षच नव्हतं. मात्र जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं, तेव्हा मात्र फारच उशीर झाला होता. आता ही तारीख जन्मभरासाठी त्याच्या हातावर कोरली गेली होती.

आपली फजिती शेअर करणाऱ्या या तरुणाच्या अनुभवानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. मी माझ्या मोठ्या मुलीच्या जन्माची तारीख गोंदवणार होतो, मात्र हा प्रकार पाहिल्यावर आता हा निर्णय आपण रद्द केल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे, तर रोमन आकड्यांचे टॅटू काढताना अनेकदा हा घोळ होतो, त्यामुळे आकडे असणारे टॅटू काढूच नका, असा सल्लाही दुसऱ्या एका युजरने दिला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके