शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:06 IST

चीनचे शास्त्रज्ञ एक अशी गोळी विकसित करत आहेत जी माणसांचं आयुष्य थेट १५० वर्षांपर्यंत वाढवू शकते.

चीनचे शास्त्रज्ञ आता एक अशी गोळी विकसित करत आहेत जी माणसांचं आयुष्य थेट १५० वर्षांपर्यंत वाढवू शकते. शेन्झेनची बायोटेक कंपनी लॉनवी बायोसायन्सेस या औषधावर काम करत आहे. ही कंपनी एक अँटी एजिंग गोळी विकसित करत आहे. गोळीतील मुख्य घटक प्रोस्यानिडिन सी1 (पीसीसी१) आहे, जो द्राक्षाच्या बियांच्या अर्कामध्ये आढळतो. कंपनीचा दावा आहे की, ही गोळी कमकुवत पेशी नष्ट करेल आणि चांगल्या पेशींचं रक्षण करेल. यामुळे माणसांचं आयुष्य वाढू शकतं. मात्र काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, हा फक्त एक दावा आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांची आवश्यकता आहे.

२०२१ मध्ये नेचर मेटाबोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासावर हा रिसर्च आधारित आहे. त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली. पीसीसी१ ने निरोगी पेशी जपताना उंदरांमधील जुन्या पेशी निवडकपणे नष्ट केल्या. परिणामी औषध घेणाऱ्या उंदरांचं सरासरी आयुष्यमान ९ टक्क्यांनी वाढलं. उपचारानंतरच्या आयुर्मानाचा विचार केला तर ते ६४.२ टक्के जास्त होते.

कंपनीचे सीईओ, यिप त्सझो (जिको) यांनी या गोळीला 'लॉन्गेविटी साइंस का होली ग्रेल' म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की निरोगी जीवनशैलीसह, १५० वर्षांपर्यंत जगणं काही वर्षांतच खरं होऊ शकते. कंपनी आता माणसांसाठी गोळी विकसित करत आहे. परंतु इतर शास्त्रज्ञ सावध आहेत. बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंगमधील तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, उंदरांमध्ये परिणाम आशादायक असले तरी, त्यांचे माणसांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत कठीण आहे.

तज्ज्ञांनी पुढे म्हटलं की, ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. औषधाची प्रभावीता आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी मोठ्या आणि कठोर क्लिनिकल चाचण्या आवश्यक आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, माणसाचं आयुष्य इतक्या प्रमाणात वाढवण्याच्या दाव्यांसाठी ठोस संशोधन पुरावे आवश्यक आहेत. चीनमध्ये दीर्घायुष्य संशोधनाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामध्ये सरकारी आणि खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

चिनी शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, विज्ञान वेगाने प्रगती करत आहे, परंतु १५० वर्षांपर्यंत जगणं अजूनही स्वप्नासारखं वाटतं. अँटी-एजिंग रिसर्च जगभरात वाढत आहे, परंतु खऱ्या यशाला वेळ लागेल. हा शोधाबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान डॉक्टरांचा सल्ला आहे की, निरोगी राहा, सकस आहार घ्या, व्यायाम आणि चांगल्या सवयी हे सध्याचं सर्वोत्तम औषध आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anti-aging Pill: Chinese Scientists Aim for 150-Year Lifespan?

Web Summary : Chinese scientists are developing an anti-aging pill potentially extending lifespan to 150 years. The drug, using Procyanidin C1, showed promising results in mice, but human trials and further research are crucial to validate these claims and ensure safety, experts caution.
टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके