शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीच्या आत आता किती सोनं शिल्लक आणि कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त सोनं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 11:50 IST

Gold on Earth : आता पृथ्वीवर किती सोनं शिल्लक आहे? तसेच सगळ्यात जास्त सोनं कोणत्या देशाकडे आहे?

Gold on Earth : सोन्याची चकाकी सगळ्यांना आवडते. अनेकांना सोन्याचे दागिने घालणं आवडतं. खासकरून महिला यात पुढे असतात. आजच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणंही सगळ्यात चांगलं मानलं जातं. जगातील बरेच देश आपल्याकडे सोनं रिजर्व करून ठेवतात. ज्याव्दारे ते दुसऱ्या देशांसोबत व्यापारही करतात. जगात अनेक सोन्याच्या खाणीही आहेत. पण आता पृथ्वीवर किती सोनं शिल्लक आहे? तसेच सगळ्यात जास्त सोनं कोणत्या देशाकडे आहे?

पृथ्वीच्या आत किती सोनं शिल्लक

बीबीसीच्या 2020 च्या रिपोर्टनुसार, अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेने अंदाज लावला आहे की, पृथ्वीच्या आत आता 50 हजार टन सोनं रिजर्व आहे. हे सोनं बाहेर काढणं बाकी आहे. तेच साधारण 1,90,000 टन सोनं आतापर्यंत खाणींमधून काढण्यात आलं आहे. पण हा केवळ अंदाजे आकडा आहे. जगात सगळ्यात जास्त सोनं साऊथ आफ्रिकेतील विटवॉटर्सरैंड बेसिन इथून काढण्यात आलं आहे. इथे जगातील 30 टक्के खोदकाम झालं आहे. तर सगळ्यात मोठी सोन्याची खाणं अमेरिकेच्या नवादामध्ये आहे.

कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त सोनं?

फोर्ब्स इंडियाच्या मार्च 2024 च्या एका रिपोर्टनुसार, वर्ल्ड गोल्ड काउंसिल ने 2023 च्या चौथ्या क्वार्टरच्या हिशेबाने सांगितलं की, अमेरिकेकडे सगळ्यात जास्त सोनं आहे. या देशाकडे 8,133.46 टन सोन्याचा भांडार आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर जर्मनी आहे. या देशाकडे 3,352.65 टन गोल्ड रिजर्व आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर इटली आहे. त्यांच्याकडे 2,451.84 टन गोल्ड आहे. भारताकडे 803.58 टन गोल्ड रिजर्व आहे.

पृथ्वीच्या कोरमध्ये इतकं सोनं

वैज्ञानिकांनी एक आश्चर्यकारक बाब सांगितलं आहे. एका थेअरीनुसार  पृथ्वीच्या गर्भा म्हणजे पृथ्वीच्या कोरमध्ये इतकं सोनं आहे की, त्याच्या 4 मीटर जाड थराने पृथ्वी झाकली जाऊ शकते. पण पृथ्वीच्या कोरमध्ये खोदकाम करण सध्या शक्य नाही. मनुष्य अजून तेवढे खोल पोहोचू शकले नाही की, त्यांना पृथ्वीच्या स्थितीबाबत सगळं काही समजू शकेल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स