China Flat Rent : भारतातील महानगरांमध्ये वाढत्या घराच्या किंमतींसोबतच वाढलेले घरभाडे देखील चिंतेचा विषय आहे. हॅपिनेस इंडेक्समध्ये भारत ११६व्या स्थानावर आहे. म्हणजे आनंदाच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत. मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या शहरांमध्ये घराचं भाडं खूप आहे. बरेच लोक आपल्या पगाराचा मोठा भाग भाड्यात खर्च करतात. पण तरीही पसंतीच घर मिळत नाही. अशात चीनमधील फ्लॅटचा एख व्हिडीओ व्हायरल झालाय. दावा केला जातोय की, कमी भाड्यात चांगलं घर मिळतं.
चीनच्या वुहान शहरातील हा व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात एका भारतीय यूट्यूबरने त्याच्या फ्लॅटचा नजारा दाखवलाय. ज्यात तो आधी राहत होता. तो तिथे आपलं काही साहित्य घेण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याने हा व्हिडीओ शूट केला.
या व्हिडिओत दाखवण्यात आलेली अपार्टमेंट शहराच्या सेंटरमध्ये आहे आणि याचं भाडं साधारण ३० हजार रूपये आहे. ही माहिती समोर येताच लोकांनी याची तुलना बंगळुरूसोबत करण्यास सुरूवात केली. कारण बंगळुरूमध्ये यापेक्षा जास्त भाडे आहे. बंगळुरूच्या अनेक भागांमध्ये १ बीएचके फ्लॅटचं भाडं २० हजार ते ४० हजार रूपये इतकं आहे. अशात चीनच्या वुहानसारख्या टिअर - २ शहरात या किंमतीत स्टुडिओ अपार्टमेंट मिळणं मोठी बाब आहे.
आपल्याला आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत या व्हिडिओला ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनी यावर कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिलं की, ऑस्ट्रेलियात मी २७ हजार रूपये देऊन शेअरिंग रूममध्ये राहतो. दुसऱ्याने लिहिलं की, दुबईत अशा रूमसाठी १ ते १.५ लाख रूपये मोजावे लागतात.
Web Summary : A viral video showcases affordable flats in Wuhan, China, around ₹30,000 per month. This has sparked comparisons with expensive rentals in Indian cities like Bangalore, where similar apartments cost significantly more. The video, featuring an Indian YouTuber's flat tour, has garnered significant attention, highlighting global housing cost disparities.
Web Summary : एक वायरल वीडियो में वुहान, चीन में किफायती फ्लैट दिखाए गए हैं, जिनका किराया लगभग ₹30,000 प्रति माह है। इससे बैंगलोर जैसे भारतीय शहरों में महंगे किराए की तुलना शुरू हो गई है, जहाँ इसी तरह के अपार्टमेंट की कीमत काफी अधिक है। एक भारतीय यूट्यूबर के फ्लैट दौरे वाले इस वीडियो ने वैश्विक आवास लागत असमानताओं को उजागर करते हुए महत्वपूर्ण ध्यान आकर्षित किया है।