शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमधील पिरॅमिड वरून कसे दिसतात? बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:16 IST

Egypt pyramid : जे लोक सामान्यपणे पिरॅमिड बघायला जातात ते त्यांना केवळ समोरून किंवा आतून बघतात. पण आज आम्ही तुम्हाला पिरॅमिड वरून कसं दिसतं हे एका व्हिडिओतून दाखवणार आहोत.

Egypt pyramid : जगातल्या सात आश्चर्यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा इजिप्तमधील पिरॅमिडचंही नाव येतं. नॅशनल जियोग्राफिकनुसार, इजिप्तचा पहिला राजा खूफू होता. ज्याने पिरॅमिडचं निर्माण केलं होतं. हजारो वर्षाआधी यांचं निर्माण करण्यात आलं होतं. पिरॅमिडच्या निर्माणाबाबत अनेक मान्यता आहे. लोक या गोष्टीने हैराण होतात की, इतके जड दगड इतक्या उंचीवर कसे नेले असतील? जे लोक सामान्यपणे पिरॅमिड बघायला जातात ते त्यांना केवळ समोरून किंवा आतून बघतात. पण आज आम्ही तुम्हाला पिरॅमिड वरून कसं दिसतं हे एका व्हिडिओतून दाखवणार आहोत.

ट्विटर अकाउंट @historyinmemes हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला ज्यात एका व्यक्ती इजिप्तच्या पिरॅमिडवर पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. आजकाल असे अनेक व्हिडीओ ग्राफिक्सच्या मदतीने बनवले जातात. पण हा व्हिडीओ खरा वाटत आहे. हा एक व्हायरल व्हिडीओ आहे. तो खरा असण्याचा दावा आम्ही करत नाही.

व्यक्ती एका पॅराशूटने उडत आहे. त्याचा चेहरा दिसत नाही. पण समोर जो नजारा दिसतो तो अवाक् करणारा आहे. समोर इजिप्तचं पिरॅमिड दिसत आहे. वरून पिरॅमिड पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, याला आश्चर्य का म्हटलं जातं? सगळ्यात वर लहान दगड आहेत. खालच्या बाजूला मोठे दगड आहेत. सर्व दगड एकसारखे ठेवण्यात आले आहेत. वरच्या दगडांवर काही निशाण आहेत. जे समजू शकत नाहीत. व्यक्ती त्या दगड्यांच्या एकदम जवळून जातो. 

या व्हिडिओला आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, कुणीही आधी दाखवलं नाही की, पिरॅमिड वरून कसे दिसतात. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स