शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कानात भुणभुण करत चावणारा डास रात्रीच्या अंधारात तुम्हाला कसा शोधतो? रंजक आहे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:54 IST

तुम्ही कधी हा विचार केलाय का की डास रात्रीच्या अंधारात आपल्याला शोधतात कसं? कशाच्या आधारे ते आपल्यापर्यंत पोहचतात?

डासांच्या चावण्यामुळे प्रत्येकजण हैराण असतो. त्यांचा उपद्रव अगदी कोणालाही जेरीस आणतो. डासांपासून वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी लोक कुंडले, द्रव पदार्थ, अगरबत्ती यांचा वापर करतात. यानंतरही या डासांवर कोणताही परिणाम होत नाही आणि ते रातोरात आपले रक्त (Blood) शोषून घेतात. पण या सगळ्यात तुम्ही कधी हा विचार केलाय का की डास रात्रीच्या अंधारात आपल्याला शोधतात कसं? कशाच्या आधारे ते आपल्यापर्यंत पोहचतात?

खरी गोष्ट म्हणजे डास आपल्याला चावत नाहीत, तर आपलं रक्त शोषून घेतात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या आजूबाजूला फिरणारे सर्व डास आपले रक्त पीत नाहीत. आपल्याला चावते ती केवळ मादी डासच असते. ते त्यांच्या अंड्यांचा विकास आणि संगोपन करतात. वास्तविक, अंड्यांसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मानवी रक्तात आढळतात. त्यामुळे ती आपलं रक्त शोषून घेते ज्याला आपण “डास चावला” असं म्हणतो.

डासांना अंधारात माणूस सापडतो कसा?यामागचं कारण म्हणजे आपला श्वास. आता तुम्ही विचार करत असाल की कसे?. वास्तविक, जेव्हा मनुष्य श्वास सोडतो तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू (CO2) बाहेर पडतो. ह्याचा वास डासांना आपल्याकडे आकर्षित करतो . मादी डासाचे ‘सेन्सिंग ऑर्गन’ बऱ्यापैकी चांगले असतात. याद्वारे कोणताही मादी डास ३० फुटांपेक्षा जास्त अंतरावरून कार्बन डायऑक्साईडचा वास ओळखतो. या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ते अंधारातही तुमच्यापर्यंत पोहोचतात. आपल्या शरीरातून रक्त शोषून मादी डास आपल्या अंड्याचे पोषण करा. कार्बन डायऑक्साइड व्यतिरिक्त, डास मानवांपर्यंत पोहोचण्यासाठी शरीरातील उष्णता, गंध आणि घाम यासारख्या इतर सिग्नलचा देखील वापर करतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके