शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

पोलिसांना कसं समजतं रेल्वेच्या कोणत्या डब्यातून खेचण्यात आली चेन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 15:43 IST

Chain Pulling In Train: तुम्हाला हे माहीत आहे का की, चेन सिस्टीममध्ये असं काय असतं की, चेन खेचताच रेल्वे थांबते?

Chain Pulling In Train:  हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, इमरजन्सीमध्ये रेल्वे थांबवण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये एक चेन लावलेली असते. जी ओढल्यानंतर रेल्वे थांबते. ही एक एकप्रकारची इमरजन्सी ब्रेक असते. पण विनाकारण ही चेन खेचणंही महागात पडू शकतं. हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, चेन सिस्टीममध्ये असं काय असतं की, चेन खेचताच रेल्वे थांबते?

जर तुम्हाला याबाबत काहीच माहीत नसेल तर याबाबत आज आम्ही सांगणार आहोत की, चेन खेचल्यानंतर रेल्वे कशी थांबते आणि चेन खेचल्यावर पोलिसांना कसं समजतं की, रेल्वेच्या कोणत्या डब्यातून चेन खेचण्यात आली आहे.

आधी समजून घेऊ रेल्वेची ब्रेक सिस्टम

सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, रेल्वेमध्ये ब्रेक कसे लागतात. रेल्वेचा ब्रेक नेहमीच लागलेला असतो. जेव्हा रेल्वे चालवायची असते तेव्हा ब्रेक सोडला जातो. ब्रेक सोडल्यानंतरच रेल्वे पुढे जाते. लोको पायलटला जेव्हा रेल्वे पुढे न्यायची असते तेव्हा ते एअर प्रेशरच्या माध्यमातून ब्रेकला टायरपासून वेगळं करतात. तसेच जेव्हा रेल्वे थांबवायची असते तेव्हा एअर देणं बंद केलं जातं. 

चेन खेचल्यावर रेल्वे कशी थांबते?

रेल्वेच्या डब्यात असलेल्या अलार्म चेनचा संबंध ब्रेक पाइपसोबत असतो आणि जेव्हा ती खेचली जाते तेव्हा ब्रेक पाइपमधून एअरचं प्रेशर बाहेर निघतं. अशात रेल्वेला ब्रेक लागणं सुरू होतं. ब्रेक लागल्यामुळे ब्रेक सिस्टीममध्ये हवेचं प्रेशर अचानक कमी होऊ लागतं. लोको पायलटला याचा संकेत सिग्नल आणि हूटिंग सिग्नल मिळतो. ज्याद्वारे त्याला समजतं की, एकतर रेल्वेची चेन खेचण्यात आली आहे किंवा रेल्वेच्या ब्रेक सिस्टीममध्ये काहीतरी गडबड आहे. ज्यानंतर योग्य कारणाची तपासणी केली जाते.

पोलिसांना कसं समजतं?

चेन कुणी खेचली हे जाणून घेण्यासाठी एका जुन्या ट्रिकचा वापर केला जातो. रेल्वेच्या ज्या बोगीमधून चेन खेचली जाते. तिथे जोरात एअर प्रेशर लीक झाल्याचा आवाज येतो. या आवाजाच्या माध्यमातून रेल्वेचे पोलीस त्या बोगीपर्यंत पोहोचतात. त्यानंतर इतर प्रवाशांच्या माध्यमातून चेन खेचणाऱ्यापर्यंत. तसं हे ब्रेक सिस्टीमवरही अवलंबून असतं. व्हॅक्यूम ब्रेक चेन खेचल्यानंतर डब्याच्या वरच्या कोपऱ्यात एक व्हॉल्व फिरतो, जो बघूनही याची माहिती मिळवता येते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके