शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

गाविलगडच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 18:46 IST

Highlight the glorious history of Gavilgad : चिखलदरा येथील गाविलगड हा विदर्भातील मोठ्या व महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.

- विवेक चांदूरकर

खामगाव :  इंग्रजांविरोधात संपूर्ण देशभरात अनेक योद्धे लढले. इंग्रजांना रोखण्याकरिता अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. काहींचे नाव समोर आले तर काही योद्धे अपरिचितच राहले. अपरिचित राहिलेला एक उपेक्षित योद्धा म्हणजे गाविलगडचा किल्लेदार बेनिसिंग. १५ डिसेंबर रोजी गाविलगड येथे शौर्यदिन साजरा करून बेनिसिंगाच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला.  चिखलदरा येथील गाविलगड हा विदर्भातील मोठ्या व महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.  इमादशहाची राजधानी गाविलगड होता. इ. स. १४९० ते १५४७ पर्यंत इमादशाहीच्या काळात किल्ल्याला राजधानीचा मान मिळाला. मोगल, निजामांच्या ताब्यात हा किल्ला होता. विविध कालखंडात किल्ल्यात बांधकाम होत राहिले. भव्य परकोट, मजबूत बुरूज, अनेक दरवाजे व तोफा या किल्ल्यात आहे. नागपूरचे रघुजी राजे भोसले यांचा मुलगा मुधोजी  याने इ.स. १७५२ मध्ये गाविलगड जिंकला. या किल्ल्यात नागपूरचे राजे भोसले आपला खजिना ठेवत होते. यावरून किल्ल्याची महती पटते. इ.स. १८०३ मध्ये किल्ल्यावर नागपूरचे राजे भोसले यांचे राज्य असताना इंग्रजांशी निकराची लढाई झाली होती. ती लढाई बेनिसिंंग यांनी प्राणपणाने लढली. ५ डिसेंबर रोजी इंग्रज अधिकारी वेलस्ली अचलपूरला आला. ७ डिसेंबरला तो देवगावला आला. तिथून त्याने किल्ला पाहल्यावर त्याच्या लक्षात आले की किल्ला जिंकणे अशक्य आहे. त्यांनी दुसरा इंग्रज अधिकारी स्टिव्हसनला अचलपूरच्या नवाबाची माणसे घेवून तीस मैलांचा चक्कर कापून किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी योग्य जागा निवडली. १२ डिसेंबर रोजी उत्तरेकडील दरवाजावर तोफांचा मारा करण्यात आला. १३ डिसेंबरला दोन्हीकडून तोफांचा मारा करण्यात आला. यावेळी आतून बेनिसिंगाचे मोजकेच सैनिक प्रत्यूत्तर देत होते. अखेरीस फितुरी झाली व इंग्रजांना किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी योग्य जागा दाखविण्यात आली. १४ डिसेंबर रोजी रात्री किल्ल्याच्या भिंतीला तोफांच्या गोळ्यांनी भगदाड पडले. इंग्रज अधिकारी केनी बरोबर एलफिस्टन १५ डिसेंबरला गेला होता. एलफिस्टनने लढाईची हकीकत लिहून ठेवली आहे. १५ डिसेंबरला इंग्रज सैन्य आतमध्ये शिरले व निकराची लढाई झाली. दोन्हीकडून बदुकांचा मारा सुरू झाला. सर्वत्र बदुकांचा आवाज घुमत होता. किल्ल्यातील दिल्ली दरवाजा अत्यंत बजबूत होता, बेनिसिंग येथे होता. इंग्रजांनी दरवाजावर हल्ला केला. दरवाजा उघडल्यावर भयंकर लढाई झाली. बेनिसिंगांने अनेक इंग्रज सैनिकांना ठार केले. अखेरीस बेनिसिंगाला हौतात्म्य प्राप्त झाले.      ५ डिसेंबरपासून लढाईच्या मोर्चेबांणीला सुरूवात झाली. १५ डिसेंबरला लढाई संपली. इंग्रजांचे भरमसाठ सैन्य, त्यातच तोफांच्या माºयामुळे गाविलगडच्या भिंतींना भगदाड पडले. भिंती पडल्या मात्र बेनिसिंहाची हिंमत कायम होती. इंग्रज सैन्य किल्ल्यात शिरले तरीही गाविलगडचे रक्षण करण्याकरिता बेनिसिंग धिरोदत्त उभा होता. इंग्रज सैन्याच्या वारांनी जखमी झालेला बेनिसिंगला अखेर शौर्यत्व प्राप्त झाले व गाविलगड पारतंत्र्यात गेला. बेनिसिंगच्या मृत्यूनंतर स्त्रीयांनी जोहार केला. लढाई हरण्याची चिन्हे दिसताच बेनिसिंह व सैनिकांच्या कुटुंबातील स्त्रियांनी सरण रचले. बेनिसिंहाचा मृत्यू होताच स्त्रियांनी आगीत उडी घेवून जोहार केला. अन्य स्त्रियांना इंग्रज सैनिकांनी जोहार करण्यापासून वाचविले. मेवाडमध्ये युद्ध हरल्यानंतर राणी पदमावतीने जोहार केल्याचा इतिहास अनेकांना माहिती आहे. मात्र, गाविलगडमध्येही महिलांनी जोहार केला होता, याची माहिती अनेकांना नाही.       बेनिसिंगाने दिलेला लढा, त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी केलेला जोहार काळाच्या ओघात लुप्त झाला. नव्या पिढीला याबाबत पुसटशीही कल्पनाही नाही. हा इतिहास जगासमोर यावा, याकरिता गत पाच वर्षांपासून स्वराज्य सेवा प्रतिष्ठान गाविलगड शौर्यदिन साजरा करीत आहे. यावर्षी गाविलगड किल्ल्यावर १४ व १५ डिसेंबर दोन दिवस स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्यावतीने गाविलगड शौर्य दिन तसेच वीर योद्धा बेनीसिंह कृतज्ञता व मातृवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण विदर्भातील दूर्ग व इतिहासप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बारलिंगा गावातून दुर्गप्रेमींनी किल्ल्यावर चढाई केली. तसेच वºहाडातील विविध क्षेत्रात कार्य करणाºयांचा सत्कार करण्यात आला. दुर्ग प्रतिष्ठानचे अतूल गुरू, प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंग राजपूत, प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांच्या मार्गदर्शनात स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पाथरे यांच्यासह मावळ्यांनी आयोजित केलेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमामुळे गाविलगडच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा मिळाला. यावेळी बेनिसिंह यांचे वंशज दुर्गाचरणसिंह किल्लेदार, प्रदीपसिंह किल्लेदार यांचीही उपस्थिती होती. ज्या तलवारीने बेनिसिंह लढला ती तलवारही यावेळी आणण्यात आली होती. आगामी पिढीसाठी शौर्यशाली इतिहास प्रेरणादायी ठरणार आहे.

टॅग्स :Fortगडhistoryइतिहास