सफरचंद खालीच का पडते, या कुतुहलातून जगाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. न्यूटनचे नाव कोणाला माहिती नसेल. पण अनेकांना हे नक्कीच माहिती नाहीय, की या जागांवर गुरुत्वाकर्षण शक्ती फार म्हणजे फार कमी, किंवा खूपच जास्त आहे. अनेकांना असे वाटते की सगळीकडेच गुरुत्वाकर्षण शक्ती समान असते. परंतू तसे नाहीय. सध्यातरी या तीन ठिकाणांनी भल्या भल्या शास्त्रज्ञांचे डोळे विस्फारून ठेवले आहेत.
न्यूटनच्या या शोधावरून अनेक उलटे-सुलटे जोक मारले जातात. अशी एक जागा आहे जिथे पाणी खालच्या दिशेने नाही तर वरच्या दिशेने वाहते. यासाठी हवा नाही तर हीच गुरुत्वाकर्षण एनर्जी कारणीभूत आहे.
गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच ग्रॅव्हिटी फोर्स ही खूप उपयोगाची असते. तिने तर चंद्राचा आकारसुद्धा बदलून ठेवला आहे. हीच शक्ती आपल्याला आणि वस्तूंना जमिनीवर ठेवते. अंतराळात या वस्तू हवा नसते पण हवेत तरंगत असतात. पृथ्वीवर काहीही वरती फेकले तर ते त्याच वेगाने पुन्हा खाली येते.
पण एक जागा अशी आहे जिथे ही शक्ती खूपच कमी आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या सँटा क्रूझ शहरात एक ठिकाण असे आहे जिथे ग्रॅव्हिटी फोर्स कमी आहे. १९३९ साली याचा शोध लागला होता. १०४० साली जॉर्स प्रेथेर या व्यक्तीने ते ठिकाण इतरांसाठी खुले केले. या जागेवर एक विचित्र शक्ती आहे, असे जाणवल्याचे यावेळी संशोधकांनी सांगितले.
जवळपास १५० स्क्वेअर फुटाच्या या गोलाकार जागेत ही चुंबकीय शक्ती विस्कळीत झालेली दिसते. पाणी वरच्या दिशेने वाहू लागते. लोकांच्या वागण्यात आणि वस्तू-यंत्रांच्या वागण्यात बदल जाणवतात. पृथ्वीच्या केंद्रापासून अंतर वाढल्याने असे होऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पण याच जागी का, त्याच्या आजुबाजुच्या जागेवर का नाही असा सवालही उपस्थित होतो. परंतू, याचे कारण कोणाकडेच नाही. भूमध्य रेषेवर ही शक्ती कमी असते. खोली जास्त असेल तरीही ही शक्ती कमी होते.
भारतातही एक जागा...याशिवाय जगात दोन अशा जागा आहेत जिथे गाडी चालविण्याची गरज भासत नाही. तिथे गेल्यावर गाड्या डोंगराच्या दिशेने आपोआप जाऊ लागतात. पहिली जागा फ्लोरिडामध्ये स्पूक हिल आणि दुसरी भारतात लडाखमध्ये मॅग्नेटिक हिल ही आहे.