शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

भारीच राव! फक्त एक महिना झोप काढण्याचे मिळणार तब्बल 26 हजार रुपये; जाणून घ्या, नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:27 IST

आरामात झोप काढण्यासाठी महिन्याला तब्बल 26 हजार रुपये मिळत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.

झोप ही सर्वांनाच अत्यंत प्रिय असते. काम करताना अनेकदा झोप येते. पण तुम्हाला जर कोणी भरपूर झोप काढण्याचे पैसे मिळतील असं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. हे खोटं वाटेल. पण हो हे खरं आहे. आरामात झोप काढण्यासाठी महिन्याला तब्बल 26 हजार रुपये मिळत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. मलाया विद्यापीठाच्या (University Of Malaya) काही संशोधकांनी खास झोपाळू आणि आळशी लोकांना एक ऑफर दिली. 

रिसर्चमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना फक्त झोप काढण्याचं बक्षीस म्हणून 26 हजार रुपये देत आहेत. मलाया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासाशी संबंधित एक पोस्टर व्हायरल होत आहे. कारण, त्यात स्पष्टपणे लिहिलंय की, त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना फक्त झोप घेण्याचं काम करावं लागतं आणि दुसरं काही करायचं नाही. त्या बदल्यात, त्याला मलेशियन चलनात 1,500 मिळतील, जे भारतीय चलनानुसार 26,500 रुपये आहेत. 

20 ते 40 वयोगटातील लोकांसाठी ऑफर

या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या लोकांसाठी काही पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सहभागींचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असावं आणि त्यांचं वजन सरासरी असावं. याचं कारण म्हणजे त्यांना खास स्लीप हाऊस बॅगमध्ये झोपावं लागतं. अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना महिनाभर घरी झोपावं लागेल आणि त्यांची देखरेख केली जाईल. झोपेची कोणतीही वेगळी स्थिती आढळल्यास, सहभागींना त्यात समाविष्ट केलं जाणार नाही. वर्ल्ड ऑफ बझच्या मिस सैफाच्या मते, स्वयंसेवकांना स्लीपींग हाऊसमध्ये पाठवण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच त्यांना त्यात समाविष्ट केलं जाईल.

30 रात्रीच्या झोपेसाठी 26 हजार 500 रुपये

एकदा ते स्क्रिनिंग पास झाल्यानंतर, लोकांना स्लीपींग हाऊसमध्ये झोपण्यासाठी पाठवलं जाईल. त्यांना 30 रात्री झोपावं लागणार असून त्याबदल्यात त्यांना 26 हजार 500 रुपये मिळतील. संशोधकांनी त्याची जाहिरात करताच, इंटरनेटवर लोक या जाहिरातीवर तुटून पडले. परिस्थिती अशी बनली की, जाहिरात व्हायरल झाल्यानंतर संशोधकांना त्यांची नोंदणी थांबवावी लागली. 2017 मध्येही फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस मेडिसिन अँड सायकॉलॉजीने, लोकांना अशाच पद्धतीने 3 महिने बेडवर झोपण्यासाठी 11.2 लाख रुपये ऑफर केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके