शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एक, दोन नाही त्याने 14 वेळा जिंकली लॉटरी, वैतागून कंपनीला बदलावा लागला नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:00 IST

लॉटरी लागावी, आपण रातोरात मालामाल व्हावे, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी वेळोवेळी लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा लॉटरी लागली.

बुखारेस्ट - लॉटरी लागावी, आपण रातोरात मालामाल व्हावे, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी वेळोवेळी लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा लॉटरी लागली. त्याला नेहमी लागत असलेल्या लॉटरीमुळे चकीत झालेल्या लॉटरी कंपनीला वैतागून अखेरीस आपला नियमच बदलावा लागला.कमाल म्हणजे गणिततज्ज्ञ असलेल्या स्टीफन मंडेल याने कोणताही दगाफटका न करता एवढ्या लॉटरी जिंकल्या आहेत. नोकरी करता करता अधिकची कमाई करण्यासाठी मंडेल यांनी लॉटरीचे तिकीट काढण्यास सुरुवात केली होती. रोमानियामध्ये जन्मलेले आणि आता ऑस्ट्रेलियन नागरिक असलेले मंडेल यांनी आपल्या गणितातील ज्ञानाचा उपयोग करून लॉटरी जिंकण्याचा फॉर्म्युला शोधून काढला होता. त्यामुळे ते एकापाठोपाठ एक लॉटरी जिंकत होते. अखेरीस मंडेल यांना रोखण्यासाठी लॉटरी कंपन्यांना आपले नियमच बदलावे लागले. रोमानियामध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहणाऱ्या मंडेल यांनी पाच अंकांच्या फॉर्म्युल्यामधून सहावा क्रमांक अचूक शोधण्यास सुरुवात केली होती. रोमानियात लॉटरी जिंकल्यानंतर ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. तिथेही त्यांनी मोठ्या जॅकपॉटवर नजर ठेवून लॉटरीचे तिकिट खऱेदी केले. तिथेही त्यांनी 12 लॉटरी जिंकल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी नियम अधिक कठोर केले. तसेच एका व्यक्तीला लॉटरीची तिकिटे खरेदी करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले. ऑस्ट्रेलियामध्ये लॉटरी जिंकणे कठीण झाल्यावर मंडेल यांनी अमेरिकेत लक्ष केंद्रित केले. तिथे त्यांनी व्हर्जिनिया राज्यात सर्वात मोठा जॅकपॉट जिंकला. दरम्यान एका घोटाळ्या प्रकरणी त्यांना 20 महिन्यांचा कारावासही झालेला आहे.   

टॅग्स :newsबातम्याJara hatkeजरा हटके