शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बासमती पेक्षा महाग आहे 'हा' तांदूळ; किंमत 1100 रुपये किलो, फक्त 'याच' देशात केली जाते शेती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:56 IST

सौदी अरेबियामध्ये सर्वात महाग भाताची लागवड केली जाते. श्रीमंत लोक ते मोठ्या आवडीने खातात.

नवी दिल्ली : पुढील महिन्यात संपूर्ण देशात मान्सून दाखल होणार आहे. यानंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे शेतकरी भातशेती करू लागतील. अशा प्रत्येक राज्यात शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाताची लागवड करतात. काश्मीरमधील शेतकरी बासमती भाताची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात, तर छत्तीसगडमधील शेतकरी जीराफूल भाताची शेती करतात. जीराफूल हा चव आणि सुगंधासाठी देशभर प्रसिद्ध आहे. 

दरम्यान, सौदी अरेबियामध्ये सर्वात महाग भाताची लागवड केली जाते. श्रीमंत लोक ते मोठ्या आवडीने खातात. या भाताच्या या जातीचे नाव हसावी आहे. त्याला हसावी तांदूळ असेही म्हणतात. याची सर्व देशांमध्ये लागवड होत नाही. वाळवंटातील हवामान आणि उष्ण हवामान हसावी भाताच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. जेवढी उष्णता जास्त तेवढे उत्पन्न मिळेल असे म्हणतात. 

हसावी तांदळाची लागवड फक्त सौदी अरेबियातच होण्याचे कारण आहे. हसावी भात लागवडीसाठी तापमान 48 अंश असले पाहिजे. यापेक्षा कमी तापमान असल्यास त्याचे पीक खराब होते. हसावी भात हे सौदी अरेबियातील शेख लोकांचे आवडते खाद्य आहे. सौदी अरेबियातही हसावी तांदळाची लागवड सर्वत्र होत नाही. शेतकरी विशिष्ट क्षेत्रात त्याची लागवड करतात. त्यासाठी भरपूर पाणी लागते. आठवड्यातून 5 वेळा पाणी दिले जाते.  

हसावी भाताची कापणी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान केली जाते. हसावी तांदळाचा रंग लाल असतो. त्यामुळे त्याला लाल तांदूळ असेही म्हणतात. हा जगातील सर्वात महागडा तांदूळ आहे. सौदी अरेबियामध्ये बिर्याणी बनवण्यासाठी वापरला जातो. तांदळाची किंमत 1000 ते 1100 रुपये प्रति किलो आहे. तर, भारतातील सर्वात महाग बासमती तांदळाचा दर 150 रुपये प्रति किलो आहे.

इंडिका तांदळाचा प्रकारहसावी तांदूळ हा इंडिका तांदळाचा प्रकार आहे. सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील प्रांत अल-अहसा ओएसिसमध्ये लोकांना हसावी तांदूळ खायला जास्त आवडतो. हसावी तांदळात बासमतीपेक्षा जास्त फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात, असे म्हणतात. यासोबतच यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही जास्त असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे सेवन केल्याने वृद्धापकाळातही लोक ताजेतवाने दिसतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbusinessव्यवसाय