शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

झोपेत चालत 'तो' 160 किमी दूर जाऊन दुसऱ्या शहरात पोहोचला अन्...; स्लीपवॉकिंगची हटके केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 11:45 IST

एका रेल्वे ट्रॅकजवळ मायकल डिक्सन नावाचा 11 वर्षांचा मुलगा अनवाणी चालत असलेला सापडला. त्याने नाईट सूट घातला होता.

झोपेत चालण्याची सवय असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या आजुबाजूला असतात. काही जण तर झोपेत चालत असताना इतके दूर जातात की त्यांना नंतर शोधूनच आणावं लागतं. अशीच एक घटना 1987 साली घडली होती आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटने ही गोष्ट शेअर केली आहे. आता या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.  स्लीपवॉकिंग हा शब्द स्वतःच सूचित करतो की ही एक मेडिकल कंडीशन आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला झोपेत चालण्याची सवय असते. 6 एप्रिल 1987 रोजी अमेरिकेतील इंडियाना येथील पेरू येथे एका रेल्वे ट्रॅकजवळ मायकल डिक्सन नावाचा 11 वर्षांचा मुलगा अनवाणी चालत असलेला सापडला. त्याने नाईट सूट घातला होता.

6 एप्रिलच्या पहाटे, रेल्वे क्रू मेंबर ज्याने मुलाला पाहिलं त्याने पोलिसांना बोलावलं आणि याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मायकल डिक्सनला तो कुठे राहतो असं विचारलं असता तो पेरूचा नसल्याचं स्पष्ट झालं. तो डेनविले, इंडियाना येथील होता. हे ठिकाण पेरूपासून 160 किलोमीटरहून जास्त दूर होते.

स्लीपवॉकिंगच्या घटनेच्या रात्री मायकेल आईला अंथरुणावर झोपलेला दिसला होता. त्याच्या आईला माहितीप्रमाणे तो घरी सुखरूप झोपला होता. अचानक त्यांना इंडियाना पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा विचित्र परिस्थितीत सापडला आहे.

झोपेत दुसऱ्या शहरात गेला

डिक्सन इतकं लांबचं अंतर झोपेत असताना कसं पार करू शकला? त्याच्या घराजवळच्या स्टेशनवरून मालगाडीत चढला. डॅनव्हिलमधील त्याचे घर रेल्वेमार्गाजवळ असल्याने, तो ट्रेनमध्ये झोपला आणि लांबचा प्रवास केला. त्याने मियामी काउंटी डिपार्टमेंट ऑफ वेल्फेअरमधील केसवर्करला सांगितलं की, त्याला ट्रेनमध्ये बसल्याचं आठवत नाही. त्याच्या पायावर जखमा होत्या. याशिवाय त्याला कोणतीही हानी झाली नाही.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मायकल डिक्सनच्या या स्लीपवॉकिंगचाही दोन वर्षांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. बॉल स्टेट डेली न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात मायकलच्या आईने सांगितले की, स्लीपवॉक करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याला अनेकदा वाईट स्वप्न पडतं आणि तो झोपेत चालायला लागतो. पण तो असा कधी याआधी घराबाहेर गेलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल