शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या होणाऱ्या बायकोला त्यांच्या लग्नाच्याच दिवशी केलं प्रपोज, एका वर्षानंतर नवरीने केलं कांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:55 IST

प्रेमात असताना माणसाला खरंच इतर कोणत्याही गोष्टींचं घेणं-देणं नसतं (Weird Love Story). याच कारणामुळे या व्यक्तीने आपल्या मित्राच्या लग्नात चक्क नवरीबाईलाच प्रपोज केलं.

प्रेम हे कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. ते वेळ, काळ, लोक, वय, धर्म हे सगळं पाहून होत नाही. म्हणूनच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. नुकतंच एका व्यक्तीने हेच सिद्ध केलं की प्रेमात असताना माणसाला खरंच इतर कोणत्याही गोष्टींचं घेणं-देणं नसतं (Weird Love Story). याच कारणामुळे या व्यक्तीने आपल्या मित्राच्या लग्नात चक्क नवरीबाईलाच प्रपोज केलं (Groom's Friend Proposed Bride on Wedding Stage).

लग्नादरम्यान बेस्ट मॅन बनलेला हा व्यक्ती वेडिंग स्पीच देण्यासाठी स्टेजवर पोहोचला तेव्हा त्याने असं काही बोललं, जे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. या घटनेचा त्यावेळी नववधू असलेल्या डेझीरी व्हाईटने स्वतः खुलासा केला आहे. ३२ वर्षीय Desiree White हिचं २०१० साली लग्न झालं होतं आणि त्यावेळी तिच्या होणाऱ्या पतीच्या मित्राने लग्नाच्या भाषणात तिला जाहीरपणे प्रपोज केलं होतं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करणाऱ्या डेझीरी व्हाईटचं लग्न होणार होतं आणि त्यावेळी ब्रायंट नावाची व्यक्ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत बेस्ट मॅन म्हणून उपस्थित होती. पार्टीत जास्त मद्यपान केल्यानंतर नवरीला पाहताच ब्रायंटला आपलं प्रेम व्यक्त करण्याची इच्छा झाली. यानंतर लग्नात स्टेजवर जाऊन स्पीच देण्यासाठी सांगताच, तो आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

ब्रायंट म्हणाला - 'मला अजूनही आठवतं जेव्हा मी डिझीरीला पहिल्यांदा पाहिलं आणि मी तिच्या प्रेमात पडलो. मला माहिती होतं की ती माझीच असणार आहे. आतापर्यंत आयुष्यात मी जितक्या लोकांना भेटलो, त्या सर्वांमध्ये ती सगळ्यात खास आहे. जेव्हा मला कळलं की तिला बॉयफ्रेंड आहे, तेव्हा मी विचार केली की आता मला काहीतरी करावं लागेल. मात्र, मी तिच्या प्रियकराला भेटलो आणि आमची मैत्री झाली. मी आता तुम्हा दोघांवर प्रेम करतो - अभिनंदन'

डेझीरी व्हाईट पुढे सांगते, की त्या दिवशी तिने ब्रायंटशी लग्न केलं नाही आणि तिच्या प्रियकराशीच लग्न केलं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या वर्षभरानंतर २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने २०१२ मध्ये ब्रायंटशी लग्न केलं. त्यांना आता ४ मुलंही आहेत आणि ते मिळून त्यांची सगळी कामं सांभाळतात. डेझीरीने असंही सांगितलं की तिचा नवरा आणि आधीचा पती हे दोघंही आता चांगले मित्र आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके