शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

नवरीला घेण्यासाठी हेलिकॉप्टरने आला होता नवरदेव, पण परवानगीच मिळाली नाही आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:40 IST

Bihar : नंतर नवरदेव आणि नवरीला गया एअरपोर्ट मार्गे जमशेदपूरसाठी रवाना करण्यात आलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील मोहद्दीपूर गावातील आहे.

Bihar : बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एक नवरदेव आपल्या नवरीला घेण्यासाठी हेलिकॉप्टरने आला होता. पण जिल्हा प्रशासनाने लॅंडिंगची परवानगीच दिली नाही. यानंतर मुलाकडील लोकांनी गावाच्या वरूनच हेलिकॉप्टरने सप्तपदी पूर्ण केली. म्हणजे हेलिकॉप्टरने वरूनच गावाला सात फेरे मारले. नंतर नवरदेव आणि नवरीला गया एअरपोर्ट मार्गे जमशेदपूरसाठी रवाना करण्यात आलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील मोहद्दीपूर गावातील आहे.

मोहद्दीपूर गावात राहणारे रामानंद दास यांची मनापासून ईच्छा होती की, आपल्या डॉक्टर मुलीचं पाठवणी हेलिकॉप्टरमधून करावी. नवरीची आई राजकुमारी या सुद्धा नुकत्याच रेल्वे हॉस्पिटलमधून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचीही ईच्छा होती की, मुलीच्या लग्नानंतर गावातूनच तिची पाठवणी हेलिकॉप्टरने करावी. पण प्रशासनाने परवानगी न दिल्याने नवरी-नवरदेवाला गया एअरपोर्टहून उड्डाण घ्यावं लागलं. प्रशासनाच्या या वागणुकीमुळे नवरीकडील लोक नाराज आहेत.

9 लाख रूपयात हेलिकॉप्टर केलं होतं बुक

रामानंद दास यांनी त्यांची मुलगी मेघा राणीचं लग्न 27 नोव्हेंबरला जमशेदपूरच्या डॉ.विवेक कुमार याच्यासोबत बोधगयातील एका हॉटेलमध्ये केलं होतं. 28 नोव्हेंबरला आपलं मूळ गाव मोहद्दीपूरमधून हेलिकॉप्टरने तिची पाठवणी करण्याची सगळी व्यवस्था केली होती. नवरीचा भाऊ मृत्युंजय कुमारने पटणाहून 9 लाख रूपयांमधये हेलिकॉप्टर बुक केलं होतं. 

नवरीकडील लोकांनी हेलिकॉप्टर लॅंडिंगसाठी गावातीलच शेतात हेलीपॅड तयार केलं होतं. पण सिक्युरिटीचं कारण देत जिल्हा प्रशासनाने लॅंडिंगची परवानगी दिली नाही. ज्यामुळे हेलिकॉप्टर गावाच्या वर काही वेळ फिरलं, सात फेरे घेतले आणि मग गयावरून जमशेदपूरहून रहावा झालं.

नवरीचे वडील रामानंद दास म्हणाले की, 'माझी मुलगी घरी शिकूनच डॉक्टर बनली होती. त्यावेळीच आम्ही ठरवलं होतं की, जो बाहेर शिकण्याचा खर्च वाचला, त्यातूनच हेलिकॉप्टरमध्ये बसवून तिची पाठवणी करू. पण प्रशासनाने परवानगी दिली नाही'.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके